विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 17 मार्च : राज्यातील सराफा मार्केटमध्ये सोन्या-चांदीचे दर रोज बदलत असतात. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात 2200 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याचे दर 58 हजार 900 रुपये प्रति तोळा झाले होते. आज या दरांत काही प्रमाणात घट झाली असून सोने 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आज नागपुरातील सोन्याचा दर 58 हजार 600 रुपये प्रती तोळा आहे. तर चांदीच्या दरात 800 रूपयांची वाढ झाली असून 67 हजार 800 रुपये प्रति किलो आहे.
गुढी पाडव्याला सोन्याची खरेदी
महाराष्ट्रातील लोकांना सोन्या-चांदीचे चांगलेच आकर्षण आहे. विशेषत: सण, उत्सव, घरगुती समारंभ यानिमित्त महिला वर्ग आवर्जून दागिन्यांची खरेदी करतो. तर गुंतवणुकीचा उत्तम मार्ग म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. मराठी नववर्षारंभ मानला जाणारा गुढी पाडवा हा सण काही दिवसांवर आला आहे. या दिवशी महाराष्ट्रात सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. त्यामुळे बदलणाऱ्या दरांवर सर्वांचेच लक्ष आहे.
सोन्या-चांदीचे दरात चढ-उतार
सोन्या-चांदीचे दरात सातत्याने बदल होत आहेत. विशेषत: दिवाळीनंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. 10 नोव्हेंबरला 52 हजार रुपयांवर असणारे सोने फेब्रुवारीत 60 हजारांच्या घरात गेले होते. त्यानंतर मार्चमध्ये पहिले 14 दिवस सोन्याच्या दरात घसरण होत होती. त्यामुळे 14 मार्चला सोने 56 हजार 500 रुपयांवर आले होते. मात्र, पुन्हा सलग दोन दिवस अनुक्रमे 668 आणि 1568 रुपयांची वाढ झाल्याने सोने 59 हजार 900 रुपयांवर गेले. मात्र, आज पुन्हा 300 रुपयांची घट झाली आहे. तर चांदीच्या दरातही चढ-उतार सुरूच आहे.
गुढीपाडव्याला बायकोला सोनं घेताय सावधान! तुमचीही होऊ शकते फसवणूक
नागपुरात दागिन्यांच्या व्हरायटी
आता नागपूरच्या बाजारपेठेत लाईट वेट ज्वेलरी, टिंपल ज्वेलरी तसेच कलर ज्वेलरीमध्ये, रोज गोल्ड, पिंक गोल्ड या दागिन्यांना विशेष मागणी आहे. कारण यामध्ये विविध प्रकार आले आहेत. तसेच महिलांचा आकर्षक आणि कमी वजनाचे दागिने परिधान करण्याकडे जास्त कल असतो. यामध्ये नवीन प्रकार आहेत आकर्षक आहेत. त्यामुळे जास्त मागणी सध्या या दागिन्यांना आहे.
नागपूर शहरातील आजचा सोन्याचा दर
नागपूर शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम)
10 ग्रॅम 24 कॅरेट - 58,600
10 ग्रॅम 22 कॅरेट- 55,700
10 ग्रॅम 20 कॅरेट- 51,900
10 ग्रॅम 18 कॅरेट- 46,900
नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम)
1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,860
1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,570
10 ग्रॅम 20 कॅरेट- 5,190
1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,690
चांदीचे दर
प्रतिकिलो - 67,800
नागपूर शहरातील कालचा सोन्याचा दर
नागपूर शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम)
10 ग्रॅम 24 कॅरेट - 58,900
10 ग्रॅम 22 कॅरेट- 55,900
10 ग्रॅम 20 कॅरेट- 52,250
10 ग्रॅम 18 कॅरेट- 46,300
नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम)
1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,890
1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,590
10 ग्रॅम 20 कॅरेट- 5,225
1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,630
चांदीचे दर
प्रतिकिलो - 67,000
टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold and silver prices today, Gold prices today, Local18, Nagpur, Nagpur News