मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Gold Price in Nagpur: उपराजधानीत तापमानासह सोनंही तापलं, पाहा आज किती मोजावे लागणार पैसे

Gold Price in Nagpur: उपराजधानीत तापमानासह सोनंही तापलं, पाहा आज किती मोजावे लागणार पैसे

Gold Price in Nagpur: नागपुरात सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज खरेदीचा विचार करत असाल तर इथं दर पाहा.

Gold Price in Nagpur: नागपुरात सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज खरेदीचा विचार करत असाल तर इथं दर पाहा.

Gold Price in Nagpur: नागपुरात सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज खरेदीचा विचार करत असाल तर इथं दर पाहा.

विशाल देवकर, प्रतिनिधी

नागपूर, 20 मे: महाराष्ट्रात सध्या लग्नसराईची धामधूम आहे. या काळात सोन्या-चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. गेल्या काही काळात सोन्याचे दर झपाट्याने वाढल्याने लोक चिंतेत आहेत. सोन्या चांदीचे दर आटोक्यात येतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र आज सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची आठवड्याच्या शेवटाला परत निराशा झाली आहे. आज नागपुरात सोन्याच्या दारात शुक्रवारच्या तुलनेत 400 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे नागपूरकरांना आज 24 कॅरेट सोन्यासाठी प्रतितोळा 61 हजार 200 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 22 कॅरेट सोन्यासाठी प्रतितोळा 58 हजार 100 रुपये द्यावे लागतील.

चांदीच्या दरात झाली मोठी वाढ

महिला वर्गाकडून सोन्यासोबतच चांदीच्या दागिन्यांनाही मोठी मागणी असते. गेल्या महिन्याभराचा विचार करता चांदीचे दरही झपाट्याने वाढले आहेत. तसेच गेल्या आठवड्यातही चांदीच्या दरात सातत्याने वाढ झाली. आज परत चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मोठी निराशा होणार आहे. आज चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना शुक्रवारच्या तुलनेत चांदी 900 रुपयांनी महाग मिळणार आहे. त्यामुळे नागपूरच्या सराफा बाजारात प्रति किलो चांदीसाठी 73 हजार 600 मोजावे लागणार आहेत.

गुंतवणुकीचा चांगला पर्याय सोनं

भारतीय लोकांना सोन्या-चांदीचं मोठं आकर्षण आहे. सण, उत्सव आणि घरगुती समारंभात लोक आवर्जुन सोनं खरेदी करतात. सध्या लग्नसराईचा काळ असल्यानं सराफा बाजारात गर्दी आहे. तसेच सोन्याकडे गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे अनेकजण सोन्यात गुंतवणूक करत असतात. पुढील काळात सोन्याची किंमती आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सोनं गुंतवणुकीचा सल्ला दिला जात आहे.

नागपूर शहरातील आजचे सोन्याचे दर (10 ग्रॅम)

10 ग्रॅम 24 कॅरेट - 61,200

10 ग्रॅम 22 कॅरेट- 58,100

10 ग्रॅम 20 कॅरेट- 54,900

10 ग्रॅम 18 कॅरेट- 49,000

नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम)

1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,120

1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,810

1 ग्रॅम 20 कॅरेट- 5,490

1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,900

चांदीचे दर प्रतिकिलो - 73,600

प्लॅटिनम 40,000

Gold Price in Nashik : नाशिकरांचा खिसा होणार रिकामा, पाहा आज किती आहेत सोन्याचे दर

नागपूर शहरातील कालचे सोन्याचे दर (10 ग्रॅम)

10 ग्रॅम 24 कॅरेट - 60,800

10 ग्रॅम 22 कॅरेट- 57,800

10 ग्रॅम 20 कॅरेट- 54,900

10 ग्रॅम 18 कॅरेट- 48,600

10 ग्रॅम 14 कॅरेट-39,500

नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम)

1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,080

1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,780

1 ग्रॅम 20 कॅरेट- 5,490

1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,860

10 ग्रॅम 14 कॅरेट-3,950

चांदीचे दर प्रतिकिलो - 72,700

प्लॅटिनम 40,000

(टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver prices today, Gold prices today, Local18, Nagpur