मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नागपूर : दारूच्या नशेत कपडे उतरवत तरुणीचा धिंगणा, VIDEO व्हायरल झाल्यावर पोलिसांचे कारवाईचे आदेश

नागपूर : दारूच्या नशेत कपडे उतरवत तरुणीचा धिंगणा, VIDEO व्हायरल झाल्यावर पोलिसांचे कारवाईचे आदेश

पबमध्ये न घेतल्यानं पब बाहेर दारुच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यानंतर आता पोलिस आयुक्तांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नागपूर, 29 मार्च : नागपूरमध्ये पब बाहेर धिंगाणा घालणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाभो पबसमोर हा प्रकार घडला आहे. या घटनेचा तपास करून तरुणीचा शोध घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तरुणीने २४ मार्च रोजी स्वत:चे कपडे उतरवून पबसमोर गोंधळ घातला. तिने यावेळी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तरुणी दाभो पबमध्ये गेली असता तिथे आधीच पार्टी सुरू होती. त्यामुळे पबमध्ये तरुणीला प्रवेश नाकारला. त्यावेळी पबमधल्या बाऊन्सरसोबत तिचा वादही झाला.

दर्शन सोळंकी प्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, IIT बॉम्बेमध्ये प्रश्नपत्रिकेवर सुसाइड नोट 

बाऊन्सरसोबत झालेल्या वादानंतर तरुणीने तिथेच स्वत:चे कपडे उतरवले आणि गोंधळ घातला. यावेळी तिने अर्वाच्च शिवीगाळही केली.

तरुणीचा हा धिंगाणा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी तिला शोधण्याचे आदेश दिले आहेत. तसंच रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. लोक बाहेरून दारू आणून हॉटेलमध्ये पितात. यामुळे हॉटेल्समध्येही वादाचे प्रकार आणि त्यातून खूनाच्याही घटना याआधी घडल्या आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलीस आयुक्तांनी कठोर भूमिका घेतलीय.

First published:
top videos

    Tags: Nagpur, Nagpur News