नागपूर, 31 डिसेंबर: थर्टी फर्स्टची पार्टी (Thirty First Party) कुठे? आम्ही तुमच्यात सामील होऊ का? असा सवाल नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) ट्विटरवरून (Twitter) विचारला आहे. नागपूरमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांना मनाई (Ban on parties) करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर इशारावजा मिश्किल ट्विट नागपूर पोलिसांनी केलं आहे. त्यावर नागरिकांनीदेखील मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
थर्टी फर्स्टची पार्टी कुठे? आम्ही तुमच्यात सामील होऊ का?
— Nagpur City Police (@NagpurPolice) December 31, 2021
आम्ही सामील होऊ का?
थर्टी फर्स्टच्या पार्टीत आम्ही सामील होऊ का, या प्रश्नाचा रोख अनेकांच्या लक्षात आला आहे, तर अनेकांच्या बिलकूल लक्षात आलेला नाही, हे या ट्विटखाली आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येत आहे. एकाने या ट्विटचा रोख समजून प्रतिक्रिया दिली आहे, ‘सर इथे गावा मधे खूप थंडी आहे आणि आम्ही घरातच आहोत. कारण stay home stay safe“. तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की या पण आमच्यात सामील व्हा. आम्हाला तुमच्यात सामील करू नका.
नको सर इथे गावा मधे खुप थंडी आहे , आणि आम्ही घरा आतच आहोत कारण stay home stay safe माझ्या कडून पूर्ण पोलीस टीमला Happy New Year
— ❤ (@SarangaViratian) December 31, 2021
आणखी एकाने सामान्य माणसाला वेगळा न्याय आणि नेत्यांना वेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित केला आहे. तर आणखी एकाने आपण घरात असून तुम्ही पोलीस ठाण्यातच आराम करा, असं म्हटलं आहे.
या घरी बसलोय बिर्याणी बनवलीय, त्यात पण मसाला राहिला म्हणून बायकोने दोन चार शिव्यांची फोडणी घातलीय
— ️ (@_shrikant_007) December 31, 2021
एकाने त्यातही आपली कैफियत मांडत आज बायकोनं बिर्याणी बनवली आहे, मात्र त्यात मसाला कमी पडल्यामुळे दोनचार शिव्यांची फोडणी घातल्याचं म्हटलं आहे.
हे वाचा- RBI चे लेटर दाखवून बंटी-बबलीने लोकांना लुटले, मनसेनं पकडून दिला 'खळ्ळ-खट्याक'
काहीजणांना मात्र या ट्विटचा रोख लक्षात आलेला नाही. त्यापैकी एकाने बघताय काय, सामील व्हा, असं म्हणत एक बाटली जास्त आणल्याचंही म्हटलं आहे. तर आणखी एकाने तुम्ही कुठल्या तरी मंत्र्याच्या घरातच असाल, असं म्हणत पोलिसांवर टीका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.