मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur: पेट्रोलचे थेंब अंगावर उडल्याने वाद, पेट्रोल पंपावर महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO VIRAL

Nagpur: पेट्रोलचे थेंब अंगावर उडल्याने वाद, पेट्रोल पंपावर महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO VIRAL

पेट्रोलचे थेंब अंगावर उडल्याने वाद, पेट्रोल पंपावर महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO VIRAL

पेट्रोलचे थेंब अंगावर उडल्याने वाद, पेट्रोल पंपावर महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO VIRAL

Nagpur viral video: पेट्रोल पंपावर महिलांमध्ये झालेल्या वादानंतर हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पेट्रोलचे थेंब अंगावर उडल्याने हा वाद झाला होता.

नागपूर, 10 डिसेंबर : नागपूर शहरातील पेट्रोल पंपावर महिलांमध्ये हाणामारी (Women free style fight in Nagpur) झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल (Women fight video goes viral) होत आहे. नागपूर शहरातील मेडिकल चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला होता. पेट्रोल भरत असताना कपड्यावर पेट्रोलचे थेंब उडल्याने वाद झाला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यासोबत वाद

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील एक महिला पंपावर पेट्रोल भरायला गेली होती. पेट्रोल भरत असताना तिच्या कपड्यांवर पेट्रोलचे काही थेंब उडाले. यानंतर त्या महिलने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

पंपावरील महिलांनी केली मारहाण

पेट्रोप पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण होत असल्याचं पाहून पंपावरील इतर महिलाही पुढे आल्या आणि त्यांनी मिळून संबंधित महिलेला मारहाण केली. पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी भर रस्त्यात एका महिलेला जबरदस्त मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये इंडियन ऑईल पेट्रोल कंपनीच्या तीन महिला लाल रंगांचा ड्रेस घातलेल्या एका महिलेला भर रस्त्यात मारत असल्याचं दिसत आहे.

वाचा : "Sorry बाबा मला माफ करा" म्हणत मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न, मन सुन्न करणारी Suicide note आली समोर

नागरिकांनी केले व्हिडीओ शूट

ही घटना घडली त्यावेळी पेट्रोल पंपावर इतरही नागरिक उपस्थित होते. उपस्थित असलेल्या नागरिकांपैकी काहींनी आपल्या मोबाइलमध्ये हा वाद आणि हाणामारीची घटना कैद केली. या हाणामारीचा व्हिडीओ आता सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

विरारमध्ये लग्न समारंभादरम्यान हाणामारी

विरार जवळच्या सकवार गावात तांबडी कुटुंबामध्ये मे महिन्यात लग्न सोहळा पार पडणार होता. मात्र लग्नाच्या पूर्वसंध्येलाच तूफ़ान राडा झाला आणि सगळे झिंगझिंग झिंगाट होऊन एकमेकांना भिडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

सुनील तांबोळी यांचा विवाह पार पाडणार होता आणि त्यांच्या लग्नाच्या एक दिवस आधी हा राडा झालेला. व्हिडीओमध्ये दिसत आहे, की या कार्यक्रमात प्रचंड गर्दी झाली होती. केवळ गर्दीच नाही तर नंतर यात सहभागी झालेले तरुण एकमेकांना अक्षरशः चोपताना दिसत आहे. लग्नातील हाणामारीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. विशेष बाब म्हणजे या गावातील सरपंच नवऱ्या मुलाच्या शेजारीच राहातात. मात्र, त्यांचं याकडे दुर्लक्ष कसं झालं? इथे जमलेली गर्दी त्यांनी पाहिली नाही का? या लोकांविरोधात विरार पोलीस कारवाई करणार का ? असे सवाल उपस्थित होत आहेत.

First published:

Tags: Crime, Nagpur, Viral videos