मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : परग्रहातील एलियननी आपल्याशी संपर्क साधला? 'त्या' उडत्या तबकडीचं काय आहे सत्य?

Video : परग्रहातील एलियननी आपल्याशी संपर्क साधला? 'त्या' उडत्या तबकडीचं काय आहे सत्य?

X
प्रकाशमान

प्रकाशमान रेल्वेप्रमाणे आकाशात उडणारी ही तबकडी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या विषयावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

प्रकाशमान रेल्वेप्रमाणे आकाशात उडणारी ही तबकडी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या विषयावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

    विशाल देवकर, प्रतिनिधी

    नागपूर, 3 फेब्रुवारी : नागपूरसह राज्याच्या अनेक भागात गुरुवारी संध्याकाळी एक वेगळचं चित्र दिसलं. आकाशामध्ये रोज दिसणाऱ्या ग्रह-ताऱ्यांशिवाय एका सरळ रेषेत धावणारी एक वस्तू अनेकांनी पाहिला. प्रकाशमान रेल्वेप्रमाणे आकाशात उडणारी ही तबकडी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी हे चित्र मोबाईलमध्ये कैद केलं. या विषयावर सोशल मीडियावर तसंच एकमेकांच्या गप्पांमध्ये चर्चेला उधाण आले होते.

    आकाशात दिसणारी ही वस्तू धुमकेतू आहे की एखाद्या देशानं सोडलेलं रॉकेट? अशी चर्चा सुरु होती. काही जणांनी तर परग्रहातून एलियन आपल्याशी संपर्क करत आहेत असाही अंदाज बांधला.  एप्रिल 2022 मध्ये विदर्भातील काही भागात उपग्रहाचे तुकडे पडल्याची घटना घडली होती ती आठवण देखील यामुळे पुन्हा एकदा ताजी झाली. या सर्व चर्चांवर पूर्णविराम देण्यासाठी आम्ही या घटनेचं सत्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नागपूरमधील खगोल शास्त्रज्ञ सुरेश चोपणे यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिलीय.

    Maharashtra Weather Update :राज्यातून थंडी गायब होणार, पारा 35 अंशांच्या पुढे जाणार?

    काय आहे सत्य?

    मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात गुरुवारी संध्याकाळी दिसलेली वस्तू दुसरी तिसरी काही नसून अमेरिकन कंपनीनं सोडलेलं सॅटेलाईट आहे. ते स्टारलिंक सॅटेलाइट असून जगाच्या अनेक भागातून दिसतात. विदर्भातील आकाशाच्या कक्षेतून त्याचे भ्रमण झाल्याने अनेक दिवसानंतर ते स्थानिक नागरिकांना यावेळी दिसले.

    2019 मध्ये त्याची सुरुवात झाली जगात इंटरनेट प्रोव्हायडर म्हणून हे सॅटेलाइट कामी येतात. 55 सॅटेलाइटची ही एक मालिका असून एकापाठोपाठ एक ते जात असल्यानं आकाशातून आगगाडी धावत असल्याचा भास होत. हे सॅटेलाईट दोन दिवसापूर्वीच हे लॉन्च झाल्यानं आकाशात दिसतील याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

    कुणाची आहे मालकी?

    स्पेस एक्स ही आकाशात पर्यटन कंपनी असून ती टेस्ला कार कंपनी तसेच ट्विटरचे मालक इलान मस्क यांच्या मालकीची आहे. अवकाशात पर्यटन सुरू करण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांशी योजनेचा हा एक भाग आहे. विशेष म्हणजे अंतराळात सॅटेलाइट चा प्रचंड कचरा जमा होत असल्याने त्यांच्या या मोहिमेवर जगभरातून टीका केली जात आहे.

    Video : 17 वर्षांपासून रस्त्यावर उभं राहून जनजागृती, 'ती' घटना आठवताच आजही उडतो थरकाप!

    आकाशात दिसणारी ही घटना खगोलीय नसून मानवनिर्मित सॅटेलाइटचे भ्रमण आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आणि घाबरून न जाता त्याचा आनंद घ्यावा असे मत खगोल तज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी बोलताना व्यक्त केले.

    First published:

    Tags: Local18, Nagpur