मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपुरातील मिरची मार्केटमध्ये आग; कोट्यवधींचं नुकसान, घटनेची भीषणता दाखवणारा VIDEO

नागपुरातील मिरची मार्केटमध्ये आग; कोट्यवधींचं नुकसान, घटनेची भीषणता दाखवणारा VIDEO

नागपूर आग बातमी

नागपूर आग बातमी

मिरची मार्केटमध्ये ही आग रात्रीच्या सुमारास लागली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  Khushalkant Dusane

नागपूर, 23 नोव्हेंबर : नागपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूरातील कळमना मिरची मार्केटमध्ये मोठी आग लागली आहे. आगीच्या या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांची लाल मिरची जळून खाक झाली आहे. या भीष आगीचा व्हिडिओही समोर आला आहे.

मिरची मार्केटमध्ये ही आग रात्रीच्या सुमारास लागली. यामुळे मिरची व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नागपूरच्या कळमना येथील APMC मार्केट मध्ये मध्यरात्री आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांची लाल सुकी मिर्ची जाळून राख झालीय. शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत साधारणतः चार ते पाच हजार मिरचीचे पोते जाळून राख झाले. यात व्यापारी आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या आगीला कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदार असून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी APMC चे संचालक आणि व्यापाऱ्यांनी केलीय. आगीवर अग्निशमन विभागाने पूर्णपणे नियंत्रण मिळविले आहे.

First published:

Tags: Fire, Nagpur News