नागपूर, 21 डिसेंबर: जळगाव (Jalgaon) येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणानं नागपुरातील (Nagpur) विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार बलात्कार (facebook friend raped married woman) केला आहे. आरोपीनं पीडित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत अनेकदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले आहेत. यातून पीडित महिला गर्भवती (victim become pregnant) राहिल्यानंतर, आरोपीनं पीडितेवर दबाव टाकून तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं आहे. यानंतर आरोपीनं लग्नाला नकार देत, तिची फसवणूक (Marriage fraud) केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं जरीपटका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्र विकास पवार असं 38 वर्षीय आरोपीचं नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील चांदसार येथील रहिवासी आहे. तर 36 वर्षीय पीडित महिला नागपुरातील जरीपटका परिसरातील रहिवासी आहे. पीडित महिला विवाहित असून तिला एक मुलगा आणि मुलगी देखील आहे. पण पतीसोबत पटत नसल्याने गेल्या काही काळापासून पीडित महिला पतीपासून वेगळं राहत आहे.
हेही वाचा-मित्रानेच केला घात, पिंपरीत 19 वर्षीय तरुणीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार
दरम्यान, 2017 साली पीडित महिलेची जळगावातील देवेंद्र याच्याशी फेसबुकवर ओळख झाली होती. कालांतराने संवाद वाढत गेल्यानंतर त्यांच्यातील ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. सुरुवातीला काही दिवस चॅटींग केल्यानंतर देवेंद्र याने पीडितेला जळगावात भेटण्यासाठी बोलावलं. याठिकाणी आरोपीनं पीडित महिलेला आपल्या मित्राच्या घरी नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिला लग्नाचं आमिष दाखवलं.
हेही वाचा-पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी प्रकार; महिलेला घनदाट जंगलात नेत केलं भयंकर कृत्य
त्यामुळे पीडित महिला आपल्या पतीला घटस्फोट देऊन आरोपी देवेंद्र याच्याशी लग्न करणार होती. आरोपी देखील नागपूराला येऊन पीडित महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागला. दरम्यान पीडित महिला गर्भवती राहिली. पण आरोपीनं पीडितेवर दबाव आणून तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं. यानंतर आरोपीनं लग्नाला नकार देत तिची फसवणूक केली. या प्रकारानंतर पीडित महिलेनं जरीपटका पोलीस ठाण्यात आरोपी देवेंद्र विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जरीपटका पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nagpur, Rape