नागपूर, 20 जानेवारी : हल्लीचे युगे स्पर्धेचे असून या स्पर्धेच्या युगात शासकीय नोकरी मिळवणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचं एक स्वप्न असतं. त्यासाठी वर्षाकाठी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. अशाच विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत गुणवंत मुला-मुलींसाठी वसतिगृह चालवले जाते. येथे प्रवेशासाठी अनेक अटी घातल्या जात असल्याने नागपुरातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे.
विभागीय स्तरावर या वसतिगृहात 10% जागा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. मात्र, असं असताना विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश करताना संबंधित परीक्षेकरता रजिस्ट्रेशनची अट घालण्यात आलेली आहे. शासन निर्णयांमध्ये रजिस्ट्रेशन बाबत कुठलीही अट घातलेली नसताना हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरत असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.
17 जून 2003 च्या शासन परिपत्रकानुसार सध्या राज्यात 243 शासकीय व 22,861 अनुदानित मुला-मुलींची वसतिगृहे कार्यरत आहेत. त्यामध्ये वसतिगृहात असलेल्या सोयी सुविधा देऊन या स्पर्धात्मक परीक्षामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी सर्वसाधारण विद्यार्थ्याप्रमाणे कसे सक्षम होतील याबद्दलची उपाययोजना पुरवण्यात येते. परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या तपशिलानुसार मुलांसाठी 21 व मुलींसाठी 7 अशी एकूण 28 वसतिगृहे सुरू करण्यास शासन मान्यता आहे.
शासन निर्णयात अट नाही
विभागीय स्तरावर या वसतिगृहांत 10% जागा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना राखीव असतात. परंतु सदर परिपत्रकात प्रवेश देताना संबंधित परीक्षेकरिता रजिस्ट्रेशनची कुठलीही अट नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन शिवाय प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.
नोंदणी शिवाय प्रवेश नाही
कॅट, सी ए टी सारख्या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी 10% जागा विभागीय स्तरावर राखीव असतात. कुठल्याही परीक्षेच्या तीनचार महिन्याआधी परीक्षेची नोंदणी सुरू होते व त्यानंतर ती परीक्षा घेतली जाते. मात्र समाज कल्याणचे असे म्हणणे आहे की, जेव्हा तुमचे नोंदणी होईल तेव्हाच तुमचे वसतिगृहासाठी पात्र असाल.
Satara : लॉकडाऊनमध्ये शोधली शिक्षणाची आयडिया, शिक्षकाला आंतरराष्ट्रीय सन्मान
कॅट करिता माझा क्रमांक आशीर्वाद नगर येथील वसतिगृहासाठी नोव्हेंबर 2022 मध्ये लागला होता. कॅट परीक्षाचे रजिस्ट्रेशन ऑगस्टमध्ये सुरू होऊन नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेतली जाते. रजिस्ट्रेशन नुसार प्रवेश मिळत असेल तर फक्त तीन महिन्याचा कालावधी तयारीला मिळेल. त्यामुळे खूप मोठा नुकसान होत आहे.
हमीपत्रावर प्रवेश द्यावा
स्पर्धा परीक्षेसाठी वसतिगृहाचा कुठलाही अर्थ राहणार नाही. रजिस्ट्रेशन अडथळा निर्माण करत असेल तर विद्यार्थ्यांकडून रजिस्ट्रेशन करण्याबाबतचे हमीपत्र लिहून घेऊन प्रवेश देणं उचित ठरू शकते मात्र तसे होत नाही. याबाबत मी अनेक ठिकाणी पाठपुरावा केला मात्र त्यावर अद्याप कुठलीही ठोस उपाययोजना झालेली नसल्याचे विद्यार्थी खेमराज मेंढे याने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.