मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : फटाके फुटतील पण प्रदूषण होणार नाही! पाहा काय आहे नवं संशोधन

Video : फटाके फुटतील पण प्रदूषण होणार नाही! पाहा काय आहे नवं संशोधन

X
environmentally

environmentally friendly crackers

निरी या संस्थेने पर्यावरणपूरक अशा फटाक्यांचे संशोधन केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 25 जानेवारी :  आनंदाचा क्षण आपण फटाके फोडून करतो. लग्नसराई, गणेश उत्सव, दिवाळी, निवडणुकांचे निकाल यासह अनेक समारंभात फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. मात्र, या फटाक्यातून निघणाऱ्या घातक धुरामुळे प्रदूषण होते. हीच बाब लक्षात घेता निरी या संस्थेने पर्यावरणपूरक अशा फटाक्यांचे संशोधन केलं आहे. नागपुरातील  बाजारपेठेत हे फटाके दाखल झाले असून या फटाक्यांच्या किमती देखील कमी आहेत. 

भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. देशभर दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर विविध फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. मात्र, या फटाक्यांमुळे होणारा धूर आणि आवाजामुळे अनेक प्रदूषणाचा समस्या देखील उद्भवत असतात. यावर उपाय म्हणून पर्यावरण क्षेत्रात संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरीने पर्यावरण पूरक फटाके तयार केले आहे.

प्रदूषणाची गंभीर समस्या

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरी ही संस्था पर्यावरण क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन करत असून पर्यावरणात प्रदूषणाचे उच्चाटन व नियंत्रण करण्यासाठी कार्यरत आहे. भारतात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध प्रकारचे फटाके फोडले जातात त्यामुळे प्रदूषणाच्या समस्या देखील उद्भवत असतात. अनेक देशांपुढे प्रदूषण ही एक मोठी गंभीर समस्या असून देशपातळीवर त्याचे अनेक दुष्परिणाम उद्भवत आहेत.

निरीचे संशोधन

निरीने पर्यावरण पूरक फटाक्यांची निर्मिती केली आहे. यामध्ये पर्यावरणाला हानी पोहोचवणारे घटक वगळून प्रदूषण कमी करणारे फटाके विकसित केले आहे. आज घडीला बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्यांपेक्षा हे फटाके पर्यावरण पूरक आहे व त्याच्या किमती देखील वीस ते पन्नास टक्क्याहून कमी आहेत. 

CSIR NEERI ही पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असून पर्यावरण पूरक संशोधन करत असते. दिवाळी फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता डॉ.साधना रायलू यांच्या नेतृत्वात प्रदूषणाला आणि न पोहोचवता दिवाळी साजरी करता यावी यासाठी इको फ्रेंडली फटाके तयार करण्यात आले आहे. 

पैशांची बचत

फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण अतिशय अल्प स्वरूपात असून पर्यावरणावर या फटाक्यांमुळे फार परिणाम होत नाही. शिवाय हे फटाके बाजारातील फटाक्यांपेक्षा माफक दरात उपलब्ध आहेत. या फटाक्यांच्या खरेदीमुळे जवळजवळ वीस ते पन्नास टक्के पैशांची बचत होणार आहे सोबतच पर्यावरणाचा समतोल देखील राखता येणार आहे.

 कमी प्रदूषणाचे फटाके 

हे फटाके तीन स्वरूपात विभागले आहेत. SWAS, SAFAL आणि STAR नावाच्या कमी प्रदूषण करणाऱ्या फटाकांचा समावेश आहे त्यांचा  विकास आणि चाचणी यात केली जाते. ज्यामध्ये सेफ वॉटर रिलीजर (SWAS): पोटेशियम नायट्रेट आणि सल्फरचा वापर कमी करते. 

आई गेली, पत्नी गेली पण सोडली नाही यात्रा, राष्ट्र प्रथम म्हणत केला भारतभर प्रवास

सेफ मिनिमल अल्युमिनियम (SAFAL) अल्युमिनियमचा कमीत कमी वापर सुरक्षित थर्माइट क्रकर (STAR) : पोटशियम नायट्रेट आणि सल्फरचा वापर कमी करते आणि पार्टिक्युलेट मॅटर (PM) मध्ये 30 टक्क्यांपर्यंत कपात  होते. पारंपारिक रसायनांच्या बदल्यात सीएसआयआरने विकसित केलेल्या सामग्रीचा वापर यामध्ये केला जातो, अशी माहिती सीएसआयआर निरी येथील प्रोजेक्ट असोसिएट पल्लवी इंगळे यांनी दिली.

First published:

Tags: Local18, Nagpur