नागपूर, 08 डिसेंबर : नागपूर मेट्रोच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. मेट्रो श्रेणीतील जगातील सर्वात लांब डबल डेकर म्हणून वर्धा मार्गावरील मेट्रोच्या उड्डाणपुलाची आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नामांकन मिळाल्या नंतर आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद करण्यात आली आहे. 3.14 किलोमीटर लांबीच्या हा डबल डेकर उड्डाणपूल तीन स्तरीय संरचनेचा भाग आहे.
उड्डाणपुलाच्या वरच्या बाजूला मेट्रो रेल्वे, मध्यम स्तरावर महामार्ग उड्डाणपूल आणि जमिनीच्या पातळीवर विद्यमान रस्ता आहे. लंडन येथे मुख्यालय असलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी ऋषीनाथ यांनी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित यांना प्रमाणपत्र प्रदान करत त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
पेट्रोल पंप धारकही निघाले कर्नाटकात, काय आहेत कारणं? Video
3.14 किलोमीटर लांबीचा पूल
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अंतर्गत नोंद होण्यासाठी महा मेट्रोने अर्ज केला होता. गिनीज बुकच्या देशातील प्रतिनिधीने त्यांचा पाठपुरावा केला आणि याविषयी संबंधित आपल्या सोबत या प्रस्तावाला सविस्तर अभ्यास केला. त्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने महा मेट्रोचा दावा मान्य करत हे नामांकन मिळाले आहे. नागपुरातील वर्धा रोडवर बांधलेल्या 3.14 किलोमीटर लांबीच्या डबल डेकर व्हायाडक्टमध्ये छत्रपती नगर, उज्ज्वल नगर आणि जयप्रकाश नगर अशी एकूण तीन मेट्रो स्टेशन आहेत.
असा झाला होता निर्णय
या स्थानकांची अभियांत्रिकी विचार प्रक्रिया, संकल्पना, रचना आणि अंमलबजावणी हे आव्हानापेक्षा कमी नव्हते. प्रकल्पाचे काम सुरू झाले तेव्हा हायवे फ्लायओव्हर आणि मेट्रो रेल्वेचे अलाइनमेंट वर्धा रोडवरील सध्याच्या हायवेवर होते. ज्यामध्ये मध्यभागी पर्यायी ठिकाणी स्वतंत्र घाट प्रस्तावित करण्यात आले होते, परंतु नंतर त्याचा आढावा घेण्यात आला आणि हायवे फ्लायओव्हर आणि मेट्रो रेल्वे एकत्रित करून डबल डेकर व्हायाडक्ट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला, जो यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे, अशी माहिती महामेट्रो कडून देण्यात आली.
कायद्याच्या कचाट्यात फसलात ? फक्त एका क्लिकवर मिळेल मोफत सल्ला, Video
जलदगतीने काम करण्याचा रेकॉर्ड
हा प्रकल्प 5 मार्च 2019 रोजी सुरू झाला होता, आणि 13 नोव्हेंबर 2020 रोजी सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. देशातील इतर मेट्रो रेल्वे प्रकल्पांपेक्षा नागपूर मेट्रो रेल्वेने जलदगतीने काम पूर्ण करण्याचा रेकॉर्ड देखील पूर्ण केला आहे. इतक्या कमी वेळात कुठलीच मेट्रो धावली नाही ही विशेष बाब होय.
ऐतिहासिक दिवस
हा दिवस केवळ महा मेट्रोसाठी नव्हे तर संपूर्ण नागपूर शहर, राज्य व देशासाठी ऐतिहासिक आहे. नागपूर महामेट्रोने कमीत कमी वेळात 20 हजारांवर प्रवासी संख्येचा आकडा पार केला असून आता 40 किलोमीटर पैकी 26 किलोमीटरचा मेट्रो मार्ग सुरू झाला आहे. मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या दुप्पट वाढणार आहे. ट्रांझिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंटची अंमलबजावणी करणारे नागपूर पहिले शहर असून आता सारेच शहर नागपूरचे अनुकरण करीत असल्याचेही डॉ.दिक्षित म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.