नागपूर, 24 जानेवारी : एखाद्या साधकाप्रमाणे राष्ट्र प्रेमाने भारावलेली व्यक्ती काय अचाट कामगिरी करू शकते, प्रसंगी त्यागाची परिसीमा गाठू शकते. असे एक उदाहरण म्हणजे नागपुरातील 53 वर्षीय दिलीप मलिक हे होय. वर्षभरापूर्वी त्यांनी 26 जानेवारी 2022 रोजी नागपूर येथील झिरो माईल येथून आपल्या सायकलवरून भारत भ्रमणाला सुरुवात करत 35 हजार किलो मीटरचा प्रवास पूर्ण केला.
दिलीप मालिके नागपूर महानगर पालिकेमध्ये कार्यरत आहे. राष्ट्र प्रेमाने भारावून त्यांनी अशाच एका साहसी मोहिमेची आखणी करत भारतभर प्रवास करण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवले आणि आपल्या जमा पुंजीतून सायकल वरून सीमेवर लढणाऱ्या देशांच्या सैनिकांप्रती देशवासीयांमध्ये स्वाभिमान जागवण्यासाठी, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, ग्रामस्वच्छता,नशा मुक्त भारत, असे बहु आयाम संदेश घेऊन प्रवास सुरू केला.
पहिल्या टप्प्याचा प्रवास
नागपुरातील झिरो माइल येथून 26 जानेवारी 2022 ला त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली. मुंबई, सुरत, गुजरात, राजस्थान, पंजाब, पठाणकोट, जम्मू, कटरा, कश्मीर, लडाख, सोनमार्ग, कारगिल, मनाली, बिलासपूर, शिमला, मार्ग, उत्तराखंड, बद्रीनाथ, कोलकत्ता असा पहिल्या टप्प्यात प्रवास करत त्यांनी 35,000 किलोमीटर प्रवास पूर्ण केला.
प्रवासादरम्यान ज्यांच्या प्रेरणेने हा प्रवास सुरू केला त्या त्यांच्या आईचा दरम्यानच्या काळात दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, घरापासून लांब असल्याने त्यांना परत येणे शक्य नव्हते. त्या दुःखाच्या वेदनेसह त्यांनी पुढील प्रवास अविरत सुरू ठेवला. पण त्यांच्या प्रवासासोबत संकट देखील त्यांच्या पाठी लागल्याप्रमाणे काहीच दिवसात त्यांच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला आणि अलीकडच्या काळात त्यांच्या पुतण्याचा देखील मृत्यू झाला या दुःखासह त्यांनी आपल्या उद्दिष्ट आणि आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठेही भावुक न होता अविरतपणे हा प्रवास सुरू ठेवला.
दिवसात मी 100 हून अधिक किलोमीटर प्रवास करण्याचा प्रयत्न करत होतो. वाटेत अनेक लोक मला भेटत होती. सायकलवर लागलेल्या राष्ट्रीय ध्वजाला बघून सगळे विचारणा करत होते. सकाळी पाच वाजता पासून मी प्रवासाला सुरुवात करून रात्री सात ते आठ वाजेपर्यंत सायकलिंग करत होतो. देशातल्या मंदिर, गुरुद्वारा, बस स्थानके हे माझ्या निवासाचे स्थान होते. मात्र काही ठिकाणी लोकांच्या प्रेमामुळे व आग्रहामुळे मला अनेकांनी सहकार्य केले.
आईचा शब्द पाळला
प्रवासात बराच अडचणी आल्या आई आणि पत्नी गेल्याची वार्ताही जेव्हा मला समजली तेव्हा अतिशय दुःख वाटत होतं. मात्र माझ्या आईनेच मला शब्द दिला होता की जो वर मोहीम पूर्ण होत नाही तोवर घरात पाय ठेवायचा नाही. त्यामुळे मला तो शब्द पाळावा लागला. येत्या 25 जानेवारी 2023 रोजी मी या मोहिमेतील शेवटच्या टप्प्यातील प्रवास करणार आहे.
नागपुरातून करता येणार अंतराळाची सफर! आठवडाभर 4 ग्रह पाहण्याची दुर्मीळ संधी
लोकांचे सहकार्य
45 हजार 711 किलोमीटर प्रवास पूर्ण करण्याचे मी उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवले आहे. मला लोकांच्या सहकार्याची व प्रेमाची अपेक्षा असून त्यांच्या पाठिंब्यानं मी ही मोहीम पूर्ण करू शकलो आहे. ज्यांना या मोहिमेत सामील व्हायचे आहे त्यांनी +918468887159 या क्रमांकावर संपर्क करावा, अशी भावना दिलीप मलिक यांनी बोलताना व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.