मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अधिकाऱ्यांना इशारा देत अजितदादांचं 'पुन्हा येईन', फडणवीसांनी सांगितली वक्तव्याची Inside Story

अधिकाऱ्यांना इशारा देत अजितदादांचं 'पुन्हा येईन', फडणवीसांनी सांगितली वक्तव्याची Inside Story

आम्ही कधी सत्तेत आलो हे कळणारसुद्धा नाही, असं सूचक विधान अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या या विधानाचं कारण सांगितलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  Shreyas

नागपूर, 3 ऑक्टोबर : साताऱ्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांसह अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. सत्तेचा माज करू नका, जाणीवपूर्वक त्रास देणं बंद करा, आम्ही कधी सत्तेत आलो हे कळणारसुद्धा नाही, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं आहे. साताऱ्याच्या मार्डीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होतं, यावेळी बोलताना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना थेट खडे बोल सुनावले, आमच्याकडे सर्व संस्था होत्या, पण कधी आम्ही सत्तेचा माज केला नाही, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. अजित पवारांनी असं वक्तव्य का केलं, याच कारणही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी अजितदादा आपली सत्ता येईल, असं कार्यकर्त्यांना सांगत आहेत, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी सत्तेत येण्याचं स्वप्न आता बघू नये, मागच्या अडीच वर्षात महाराष्ट्रात मोगलशाही आणि एकतर्फी सरकार चालवलं, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

भाजप नेते आणि आमदार प्रविण दरेकर यांनीही अजित पवारांच्या या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांचा माज काय असतो, हे महाराष्ट्राने अनेकदा पाहिलं आहे. त्यांचा माज साज सांगण्याची आवश्यकता नाही. सत्तेचा माज कुणीही करत नाही, आजही फडणवीस जमिनीवर आहेत. मुजोर राजवट कुणाची होती, हे महाराष्ट्राने पाहिलं. आम्ही जमिनीवर, आमचं सरकार जमिनीवर आणि जनता सुखी आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.

First published:

Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis