Home /News /maharashtra /

राज्यातील सरकार स्थापनेत अमित शाहांची भूमिका काय? फडणवीसांनी आता स्पष्टच सांगितलं

राज्यातील सरकार स्थापनेत अमित शाहांची भूमिका काय? फडणवीसांनी आता स्पष्टच सांगितलं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा यांचे आभारही मानले. अमित शाह यांचे आशीर्वाद पाठीशी असल्यानेच हे काम करू शकलो, असं ते म्हणाले.

    नागपूर 05 जुलै : गेल्या 10 ते 15 महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. यादरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदी बसले. उपमुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस (Devendra Fadnavis) आज पहिल्यांदाच नागपुरात गेले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 2019 मध्ये आपल्यासोबत बेईमानी झाली. आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेला. मात्र आता पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्त्वात आपलं सरकार आलं आहे. मराहाष्ट्राच्या जनतेचं सरकार आलं आहे, असं फडणवीस म्हणाले. "सगळे सोबत आहात ना रे बाबांनो..." उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना फोन, शिवसेना पक्षप्रमुख नेमकं काय म्हणाले? यासोबतच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केली. फडणवीस म्हणाले, की मागील अडीच वर्ष कोण राज्य चालवतंय हेच कळत नव्हतं. या काळात विदर्भावर विशेष अन्याय झाला. विदर्भातील शहरांचा निधी परत माघारी पळवला गेला. मात्र, आज पुन्हा विदर्भाला प्रगतीवर आणणारं सरकार आलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा यांचे आभारही मानले. अमित शाह यांचे आशीर्वाद पाठीशी असल्यानेच हे काम करू शकलो. यासाठी जे पी नड्डा यांचेही आभार मानतो, असं फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं. फडणवीसांनी सांगितलं, की मी सरकारमध्ये काही पद घेणार नाही हे सांगितलं होतं. मात्र, राष्ट्रीय अध्यक्षांनी जाहीर करून टाकलं. त्यांनंतर पंतप्रधांनांनीही मला फोन केले आणि मी उपमुख्यमंत्री होण्यास तयार झालो. राजकीय भूकंप घडवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर झाडं कोसळलं, ठाणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या गाडीवर आदळलं फडणवीस पुढे म्हणाले, की शेवटी पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे.. या नागपुरमधला देवेंद्र फडणवीस भाजप आणि मोदीजी नसते तर कधीच मुख्यमंत्री झालो नसता. जे मला सर्वोच्च पदावर बसवतात त्यांनी उद्या मला खाली बसायलाही सांगितली तरी मला मान्य आहे. हे सरकार अडीच वर्ष पूर्ण करणारच असा विश्वास व्यक्त करत फडणवीस म्हणाले, की अडीच वर्षानंतर राज्यात बहुमताचं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही. आता पुढची अडीच वर्ष कर्मयोगाची वर्ष आहेत. राज्याला पुन्हा प्रगतीपथावर आणणार आहे. .मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जात आहे, असंही ते म्हणाले.
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde

    पुढील बातम्या