नागपूर, 28 मार्च : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधल्या घरात बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन करण्यात आला होता. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा हा फोन केला. या धमकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या घरी लगेचच बॉम्ब शोधक पथक दाखल झालं. तसंच पोलिसांनी त्यांच्या घराची सुरक्षाही वाढवली.
पोलीस तपासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार घरातले लाईट गेल्यामुळे या व्यक्तीने फडणवीसांच्या घरी बॉम्ब ठेवल्याचा फोन केला होता. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
गडकरींना धमकी देणारा ताब्यात
दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांथाचा ताबा, नागपूर पोलिसांना मिळाला आहे. तो बेळगावच्या जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गडकरी यांच्या कार्यालयात 21 मार्चला लागोपाठ तीन कॉल आले. दरम्यान नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis