मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'काही लोकांची अडचण झालीये'; सुळेंच्या 'त्या' टीकेला फडणवीसांचे दोन शद्बात उत्तर

'काही लोकांची अडचण झालीये'; सुळेंच्या 'त्या' टीकेला फडणवीसांचे दोन शद्बात उत्तर

सुप्रिया सुळेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

सुप्रिया सुळेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला फडणवीसांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. संजय राऊत यांना धमकीचा मॅसेज आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 1 एप्रिल : संजय राऊत यांना बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज आला आहे. यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. लोकप्रतिनिधींना वारंवार अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत, याचा अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा नाही काय ? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंच्या या टीकेचा जोरदार समाचार घेत टोला लगावला आहे.

फडणवीसांची प्रतिक्रिया  

मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे, याची मला कल्पना आहे. अनेक लोकांना असं मनातून वाटतंय की मी गृहमंत्री राहिलो नाही, तर बरं होईल. मात्र त्या सर्वांना माझं सांगणं आहे की मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह विभागाचा प्रभार दिला आहे.  त्यामुळे जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही.  गृहमंत्री म्हणून यापूर्वीही पाच वर्ष मी काम सांभाळलं आहे. आताही जे लोक बेकादेशीर काम करतील त्यांना मी सोडणार नाही.  मी कोणाला घाबरत नाही जे काही कायदेशीर आहे तेच करतो असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

धमकी देणाऱ्याची ओळख पटली  

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांना आलेल्या धमकीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना ज्याने धमकी दिली, त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार त्याने दारूच्या नशेत धमकी दिली आहे. यासंदर्भात संपूर्ण तपास केला जाईल आणि ज्याने कोणी धमकी दिली त्याच्यावर कारवाई होईल. महाराष्ट्रमध्ये कोणी कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाहीत ती व्यक्ती कोणीही असो कारवाई होईल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Devendra Fadnavis, NCP, Sanjay raut, Shiv sena, Supriya sule