मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट प्रकरणात शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी; घराबाहेर आढळली नोट

नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट प्रकरणात शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी; घराबाहेर आढळली नोट

रझा अकादमीने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस आता दिल्लीत जाऊन नुपूर शर्मांना नोटीस देणार आहे.

रझा अकादमीने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस आता दिल्लीत जाऊन नुपूर शर्मांना नोटीस देणार आहे.

नेत्याच्या घराबाहेर एक चिठ्ठी आढळली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली.

  • Published by:  Meenal Gangurde
नागपूर, 18 ऑगस्ट : नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या व्यक्तींसोबत दुर्देवी प्रकार घडल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. दरम्यान नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या नागपूर शिवसेना उपशहरप्रमुखाला धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. शिवसेना उपशहरप्रमुख लॅारेन्स ग्रेगरी यांनी 9 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत नुपूर शर्मा यांचा उल्लेख केला होता. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी लॉरेन यांच्या घरी दगडाला चिठ्ठी बांधून ठेवण्यात आली. या चिठ्ठीत लॉरेन यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. भीती पोटी लॉरेन यांनी पोलिसात धाव घेतली. त्यांनतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात सदर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. लॉरेन यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. 'नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्यामुळे अमरावतीत 10 जणांना धमकी'; भाजप नेते अनिल बोंडेंचा मोठा आरोप यापूर्वी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या प्रकरणी उदयपूरमधील टेलर कन्हैयालालची हत्या करण्यात आली होती. ही हत्या  होण्याच्या बरोबर एक आठवडापूर्वी अमरावतीमधील उमेश कोल्हे या 54 वर्षांच्या केमिस्टची हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांनी भाजपामधील निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या बाजूनं पोस्ट लिहिली होती. अमरावतीतील घटनेनंतर शहरातील 10 जणांना नुपूर शर्मांबद्दलपोस्ट टाकल्याने जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी केला होता.
First published:

Tags: Crime news

पुढील बातम्या