मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

RSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार 'ही' गोष्ट, विजयादशमी उत्सवात दिसणार खास व्यक्ती!

RSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार 'ही' गोष्ट, विजयादशमी उत्सवात दिसणार खास व्यक्ती!

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक घटना घडणार आहे.

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक घटना घडणार आहे.

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक घटना घडणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 4 ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासात विजयादशमीला खास महत्त्व आहे. नागपूरमध्ये विजयादशमीच्याच दिवशी 1925 साली  या संघटनेची स्थापना झाली. डॉ. हेडगेवार यांनी नागपुरात सुरू केलेल्या संघटनेचा आज जगभर विस्तार झाला आहे. लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भारतीय जनता पक्षावरही संघाचा मोठा प्रभाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील राजकारणात सक्रीय होण्यापूर्वी संघाचे प्रचारक होते.

नागपूरच्या उत्सवाला महत्त्व का?

रा.स्व. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातील विजयादशमी उत्सवाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. विजयादशमीच्या दिवशी सरसंघचालक संघाची आगामी काळात वाटचाल कशी असेल याचे संकेत देतात. स्वयंसेवकांनी कोणत्या क्षेत्रात आगामी काळात कार्य करावं, संघ कार्यासमोरील आव्हानं, देशाच्या तसंच जागतिक क्षेत्रातील ताज्या घडामोडीवर संघाची अधिकृत भूमिका विजयादशमीच्या दिवशी होणाऱ्या भाषणामध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्पष्ट करतील. त्यामुळे या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता आहे.

दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंचा सामना, मुंबई पोलिसांचा ऍक्शन प्लान तयार

97 वर्षामध्ये पहिल्यांदाच...

यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी कार्यक्रम विशेष असणार आहे. संघाच्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विजयादशमीच्या उत्सवात प्रमुख पाहुण्या म्हणून महिलेला निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पद्मश्री संतोष यादव या प्रमुख पाहुण्या असतील.

एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात ठाकरेंना आणखी धक्के देणार? 24 तास आधी म्हणाले...

कोण आहेत संतोष यादव?

संतोष यादव या देशातील प्रसिद्ध गिर्यारोहक आहेत. त्यांचा जन्म 1969 साली हरियाणामध्ये झाला. मे 1993 मध्ये त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पहिल्यांदा सर केले. त्यानंतर 1994 साली पुन्हा एकदा त्यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. एव्हरेस्ट शिखर दोन वेळा सर करणाऱ्या त्या जगातील पहिल्या आहेत. यादव यांना या कामगिरीबद्दल 2000 साली पद्मश्री पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आले आहे. 54 वर्षांच्या संतोष यादव सध्या इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

First published:

Tags: Dasara, Nagpur, RSS, Rss mohan bhagwat