मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara 2022 : रावणामुळे जगल्या 3 पिढ्या, पाहा नागपूरच्या कुटुंबाची गोष्ट Video

Dasara 2022 : रावणामुळे जगल्या 3 पिढ्या, पाहा नागपूरच्या कुटुंबाची गोष्ट Video

विजयादशमीला रावणाचे दहन केले जाते. या मूर्ती नागपुरात तयार केल्या जातात. येथे तयार झालेल्या मूर्ती बाहेर राज्यात देखील विक्री केल्या जातात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 04 ऑक्टोबर : असत्यावर सत्याचा विजय म्हणजेच विजयादशमी. विजयादशमीला रावणाचे दहन करून हा विजय उत्सव साजरा केला जातो. मर्यादा पुरुषोत्तम राचंद्रांनी  रावणाच्या तावडीतून सीतेची मुक्तता केली आणि युद्धात रावणाचा वध केला. तेव्हापासून विजयादशमीला रावणाचे दहन केले जाते. मात्र, या भल्या मोठ्या मूर्ती कुठे तयार होत असतील, असा असा प्रश्न नक्की पडतो. तर या मूर्ती बनतात नागपुरात. येथे तयार झालेल्या मूर्ती बाहेर राज्यात देखील विक्री केल्या जातात.  

तीन पिढ्यांचा व्यवसाय

समाजात रावणाकडे बघण्याचा दृष्टिकोण जरी नकारात्मक असला तरी नागपुरातील बिनवार कुटुंबियांसाठी रावण निर्मितीचा व्यवसाय त्यांच्या तीन पिढ्यांपासून उदरनिर्वाहाचे माध्यम बनला आहे. पारंपारिक पद्धतीने बांबू कागद, रंग अशा साहित्यापासून रावणाच्या मूर्ती निर्मितीचे काम ते पिढ्यानपिढ्या करत आहेत. कोरोना काळाच्या निर्बंधातून मुक्तता मिळाल्याने दोन वर्षानंतर देशभर रावण दहन मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे. बिंनवार कुटुंबीयांच्या वतीने निर्माण केलेल्या रावणाला नागपूरसह इतर राज्यातून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते. मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये येथील मूर्तीची विक्री होती.

Dasara 2022 : दसऱ्याच्या पूजेसाठी शूभ मुहूर्त काय? आपट्यांच्या पानांना का आहे महत्त्व?

कोरोना काळात आर्थिक संकट

रावण निर्मितीसाठी प्रचंड वेळ, जागा आणि कुशल कामगारांची गरज असते. कोरोनामुळे मागील दोन वर्ष रावण दहन मोठ्याप्रमाणात झाले नाही. त्यामुळे बिनवार कुटुंबीयांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. यंदा मात्र सर्व निर्बंधातून मुक्तता मिळाल्याने सर्वत्र हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मूर्तीची विक्री चांगल्या प्रकारे होत आहे. 

शासनाच्या सुविधांचा लाभ मिळत नाही

विजयादशमीला नागपुरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क येथे विजयादशमीनिमित्त रावण दहन करण्यात येणार आहे. नागपुरातील सर्वांत मोठा रावण, मेघनाथ, आणि कुंभकरण यांच्या पुतळ्याचे दहन होणार आहे. मूर्ती निर्मितीतून आमच्या कुटुंबीयांना ओळख, पैसा, प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र आज घडीलाही शासनाच्या वतीने आम्हाला कुठलीही सोय सुविधा उपलब्ध नाहीत. आम्हा कलाकारांकडे शासनाने लक्ष द्यावं असे मूर्तिकार हेमराजसिंग बिनवार यांनी सांगितले.

First published:

Tags: Dasara, Nagpur, Nagpur News, Navratri