मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Ind vs Aus : रोहित, विराटपेक्षा 'या' खेळाडूवर आहे नागपूरकरांची मोठी भिस्त! Video

Ind vs Aus : रोहित, विराटपेक्षा 'या' खेळाडूवर आहे नागपूरकरांची मोठी भिस्त! Video

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टी20 मॅच नागपूरमध्ये होत आहे. नागपूरच्या जामठा स्टेडियमवर तब्बल 3 वर्षानंतर मॅच होणार आहे

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टी20 मॅच नागपूरमध्ये होत आहे. नागपूरच्या जामठा स्टेडियमवर तब्बल 3 वर्षानंतर मॅच होणार आहे

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टी20 मॅच नागपूरमध्ये होत आहे. नागपूरच्या जामठा स्टेडियमवर तब्बल 3 वर्षानंतर मॅच होणार आहे

नागपूर, 23 सप्टेंबर :  भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टी20 मॅच नागपूरमध्ये होत आहे. नागपूरच्या जामठा स्टेडियमवर तब्बल 3 वर्षानंतर मॅच होणार आहे. कोरोना ब्रेकनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या मॅचचा नागपूरमध्ये मोठा उत्साह पाहयला मिळत आहे. ही मॅच पाहण्यासाठी नागपूर शहरासह, विदर्भातील जिल्हे आणि मध्य प्रदेशातून देखील क्रिकेट फॅन्स आले आहेत. भारताला विजय आवश्यक मोहालीमध्ये झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय टीम 0-1 ने पिछाडीवर आहे. आता मालिका जिंकण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे टीम इंडियाला आवश्यक आहे.  या मॅचमध्ये टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह मोठ्या ब्रेकनंतर खेळणार आहे. बुमराह आशिया कप स्पर्धेत दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. त्याचबरोबर मोहालीत झालेल्या पहिल्या मॅचमध्येही त्याची गैरहजेरी भारतीय टीमला जाणवली. आज बुमराह मोठ्या ब्रेकनंतर खेळणार असल्यानं क्रिकेट फॅन्समध्ये उत्साहाचं वातावरण आहे. जामठा ते रहाटे कॉलनी 'ग्रीन कॉरिडॉर' 45 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या जामठा स्टेडियममध्ये आतापर्यंत 12 पुरुषांचे व दोन महिलांचे टी-20 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यासाठी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे. सामना संपल्यानंतर रात्री परत येताना रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून जामठा ते रहाटे कॉलनी असा ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात आला आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, जामठा स्टेडियम, रेडिसन ब्ल्यू आणि ली मेरिडन या ठिकाणी बंदोबस्त असेल. २१ ते २४ असा हा बंदोबस्त राहणार असून विदेशी दर्शक आणि पाहुण्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष असणार आहे. स्टेडियमच्या १३ प्रवेशद्वारांवर पोलीस राहणार असून मैदानामध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनने खासगी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था केली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून विशेष नियोजन करण्यात आले आहे. Video: 49 वर्षांच्या सचिनची जबरदस्त फटकेबाजी पाहून तुम्हालाही आठवेल 'डेझर्ट स्ट्रॉम' तब्बल 6०० पोलीस यासाठी तैनात आहेत. ७ पोलीस उपायुक्त, १० सहायक आयुक्त, 35 निरीक्षक, 138 सहनिरीक्षक आणि 1600 पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. मैदानाच्या काही अंतरावर वाहनतळ असून मैदानापर्यंत बससेवा देण्यात आली आहे.
First published:

Tags: Cricket news, India vs Australia, Nagpur

पुढील बातम्या