मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /IND vs AUS : नागपूर टेस्टमधील महत्त्वाचा दिवस, कसं असेल आजचं हवामान?

IND vs AUS : नागपूर टेस्टमधील महत्त्वाचा दिवस, कसं असेल आजचं हवामान?

टीम इंडियाचे ऑल राऊंडर अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा ( फोटो AP)

टीम इंडियाचे ऑल राऊंडर अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा ( फोटो AP)

IND vs AUS Nagpur Test : नागपूर टेस्टच्या पहिल्या दोन दिवसांवर टीम इंडियानं वर्चस्व गाजवलं. आता तिसऱ्या दिवशी शहरातील हवामान कसं आहे?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

विशाल देवकर, प्रतिनिधी

नागपूर, 11 फेब्रुवारी :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूरमध्ये सुरू असलेल्या टेस्टमधील पहिल्या दोन दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व होतं. या टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाची टीम 177 रनवर ऑल आऊट झाली. त्याला उत्तर देताना टीम इंडियानं दुसऱ्या दिवशी चिवट खेळ करत दिवसअखेर 7 आऊट 321 रन केले आहेत. भारतीय टीमकडं दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 144 रनची आघाडी आहे. ही आघाडी आणखी वाढवून चौथ्या इनिंगमध्ये बॅटींगला न येण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. टीम इंडियाच्या या प्रयत्नांना तिसऱ्या दिवसाचं हवामान साथ देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

काय आहे अंदाज?

नागपूर टेस्टच्या तिसऱ्या दिवशी (11 फेब्रुवारी) हवामान पहिल्या दोन दिवसांप्रमाणेच स्वच्छ राहण्याचा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केलाय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी नागपूरमधील कमाल तापमान 34 अंश तर किमान 12 अंश सेल्सियस तापमान होते. आता शनिवारी म्हणजेच टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी कमाल तापमानात 1 अंश सेल्सियसनं वाढ होऊन ते 35 अंश होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर दिवसभरात पावसाची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्सना शनिवारी मॅचचा आनंद घेण्याची संधी आहे.

'एक पाऊल', अपघातानंतर पहिल्यांदाच ऋषभ पंतने शेअर केला स्वत:चा फोटो

रोहितची दमदार सेंच्युरी

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची सेंच्युरी हे दुसऱ्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. स्पिन बॉलिंगला मदत करणाऱ्या पिचवर रोहितनं 120 रनची खेळी केली. ही त्याची टेस्ट करिअरमधील दहावी सेंच्युरी आहे. या सेंच्युरीसह रोहितनं एक नवा इतिहास रचला आहे.

IND vs AUS : नागपूरमधील 'त्या' घटनेमुळे रोहितला करावी लागली 3 वर्ष प्रतीक्षा! Photos

क्रिकेटच्या तीन्ही फॉरमॅटमध्ये सेंच्युरी करणारा तो पहिला भारतीय कॅप्टन ठरला आहे. महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यालाही जे जमलं नाही ते रोहितनं करून दाखवलं. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी हाफ सेंच्युरी झळकावत भारतीय टीमला मजबूत स्थितीमध्ये नेलं. शुक्रवारचा खेळ संपला तेंव्हा जडेजा 66 तर अक्षर पटेल 52 रन काढून खेळत होते.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Local18, Nagpur, Weather Forecast