मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Omicron ने वाढवली चिंता, नागपूर जिल्ह्यात प्रवेशासाठी आता लसीकरण अन् RTPCR बंधनकारक

Omicron ने वाढवली चिंता, नागपूर जिल्ह्यात प्रवेशासाठी आता लसीकरण अन् RTPCR बंधनकारक

Omicron variant of coronavirus: दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे चिंता वाढली आहे.

Omicron variant of coronavirus: दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे चिंता वाढली आहे.

Omicron variant of coronavirus: दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे चिंता वाढली आहे.

नागपूर, 30 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमायक्रॉन हा नवा विषाणू (Omicron variant of Coronavirus) आढळून आला आहे. या नव्या विषाणूमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. यामुळेच खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारसह (Maharashtra Government) स्थानिक प्रशासनाकडूनही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी निर्बंध कठोर करण्यात येत आहेत. नागपूर जिल्हा प्रशासनाने (Nagpur district) सुदधा खबरदारी म्हणून परराज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी काही नियमावली निश्चित केली आहे.

जिल्हा प्रवेशासाठी लसीकरण आवश्यक

नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड संदर्भातील सद्यास्थिती लक्षात घेता नवे आदेश जारी केले आहेत. यामध्ये तिकीट असणाऱ्या किंवा नसणाऱ्या कार्यक्रमात लसीकरणाशिवाय सहभागी होता येणार नाही. मॉलपासून बाजारापर्यंत, सार्वजनिक प्रवासी यंत्रणेचा प्रवासी वापर, सर्व आस्थापनावरील भेटी, नागपूर जिल्ह्यात प्रवेश यासाठी संपूर्ण लसीकरण आवश्यक करण्यात आले आहे.

वाचा : Omicron Variant नं प्रभावित आफ्रिकन देशांच्या मदतीसाठी सरसावला 'भारत' देश, अशी करणार मदत

नियमांचे उल्लंघन केल्यास दंड

चित्रपट, नाट्यगृह उपस्थिती क्षमतेच्या 50 टक्के अनुमती देण्यात आली आहे. 1 हजारापेक्षा गर्दीच्या कार्यक्रमासाठी माहिती प्रशासनाला देणे आवश्यक आहे. यासंदर्भात नियम न पाळणाऱ्यांना 500 ते 10 हजारापर्यंत दंड आकारण्यात आला आहे. सोबत कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना सक्तीचे विलगीकरण व इतर कडक करण्यात आले.

सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेला झीरो सर्वेचा अहवाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. या अहवालात सहा हजार लोकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते, त्यामध्ये त्यांच्या शरीरात असलेली अँटीबॉडी चेक केली जाणार आहे.

वाचा : Omicron Variant मुळे जगभरात भीतीचं वातावरण, अनेक देशांमध्ये आढळले रुग्ण; प्रवासी बंदीसह अनेक कठोर निर्बंध लागू

डेल्टा व्हेरियंटपेक्षा Omicron व्हेरिएंट 6 पट अधिक संसर्गजन्य

कोरोना विषाणूचे नवीन रूप B.1.1.529 (Omicron) जगासमोर एक नवीन समस्या बनली आहे. डब्ल्यूएचओने याबद्दल चिंता व्यक्त केली असून "चिंतेचे प्रकार" (Variant of concern) म्हणून सूचीबद्ध केले आहे. जगभरातील तज्ञांचा दावा आहे की ओमायक्रॉन सारख्या धोकादायक प्रकारांवर मोनोक्लोनल अँटीबॉडी थेरपीचा कोणताही प्रभाव नाही. या प्रकारातील ताकद आणि वैशिष्ट्यांबाबत अनेक नवीन गोष्टीही समोर आल्या आहेत.

ओमायक्रॉन प्रकार किती धोकादायक आहे?

दक्षिण आफ्रिकेसह इतर देशांमध्ये ओमायक्रॉन संसर्गाच्या प्राथमिक विश्लेषणावरुन डेल्टा प्रकारापेक्षा सहापट अधिक शक्तिशाली असे वर्णन केले जात आहे. डेल्टा हा तोच प्रकार आहे ज्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात कहर केला होता. हा प्रकार रोगप्रतिकारक शक्तीला देखील हुलकावणी देऊ शकतो. न्यू यॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, ओमायक्रॉन आधीच्या प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य असून लसीकरण किंवा नैसर्गिक संसर्गामुळे होणारी रोगप्रतिकारक प्रतिक्रिया देखील निष्क्रिय करू शकते.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus, Nagpur, महाराष्ट्र