मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकनाथ शिंदेंच्या भाषणाची नाना पटोलेंनी उडवली खिल्ली, म्हणाले ही स्क्रिप्ट तर...

एकनाथ शिंदेंच्या भाषणाची नाना पटोलेंनी उडवली खिल्ली, म्हणाले ही स्क्रिप्ट तर...

दोन शाहिर रात्रभर भांडुन लोकांचे मनोरंजन कसे करतात तसे दसरे मेळावे झाले

दोन शाहिर रात्रभर भांडुन लोकांचे मनोरंजन कसे करतात तसे दसरे मेळावे झाले

दोन शाहिर रात्रभर भांडुन लोकांचे मनोरंजन कसे करतात तसे दसरे मेळावे झाले

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhandara, India
  • Published by:  News18 Desk

नेहाल भुरे, प्रतिनिधी

भंडारा, 6 ऑक्टोबर : दोन शाहिर रात्रभर भांडुन लोकांचे मनोरंजन करतात तसे दसरे मेळावे झाले, असे परखड मत व्यक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दसरा मेळाव्याची खिल्ली उडविली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दसरा मेळाव्यात मोदी- शहा यांनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचुन दाखविल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

काल बुधवारी मुंबई येथे बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर सभेत काँगेसवर जबर टिका केली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्भव ठाकरे यांच्या मेळाव्यात काँगेस आणि राष्ट्रवादी यांचे कार्यकर्ते असल्याच्या तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोड़ो यात्रेत ठाकरे समर्थकाचा भरणा असल्याच्या आरोप शिंदे यांनी केला होता. त्यावर नाना पटोले यांनी वरील तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, दोन शाहिर रात्रभर भांडुन लोकांचे मनोरंजन कसे करतात तसे दसरे मेळावे झाले असून एकनाथ शिंदे हे काल दसरा मेळाव्यात मोदी- शहा यांनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचुन दाखवली, असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसवरील आरोप तेहि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी केले, हे हास्यास्पद असल्याचे व्यक्तव्य नाना पटोले यांनी केले. तर यावेळी राहुल गांधी भारत जोडो यात्रेत प्रामाणिक प्रयत्न करत असल्याची पाठ राखणही नाना पटोले यांनी केली.

हेही वाचा - Kishori Pednekar : ...शिंदेंना भाषण फडणवीसांनीच लिहून दिलं, किशोरी पेडणेकरांचा पलटवार

केंद्रातील मोदी सरकारचा अंतिम क्षण -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भेटलेला प्रतिसाद लक्षात घेता हा केंद्रातील मोदी सरकारचा अंतिम क्षण असून हे सरकार जाणार आहे, त्यामुळे किती कोणाला पद वाटायचे वाटून घ्या, असे खोचक टोलाही नाना पटोले यांनी लगावला. माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद बुलडाण्याचे खासदार शिंदे गटातील प्रतापराव जाधव यांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यांनी हा टोला लगावला.

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणूकमध्ये काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार नसल्याची माहितीही नाना पटोले यांनी दिली. काँग्रेस आपला पाठिंबा शिवसेना उमेदवाराला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

First published:

Tags: Cm eknath shinde, Nana Patole, Shiv sena dasara melava