मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /निवडणुकांपूर्वीच काँग्रेसमधील अतंर्गत वाद चव्हाट्यावर; राज्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या गटाचा मोठा निर्णय!

निवडणुकांपूर्वीच काँग्रेसमधील अतंर्गत वाद चव्हाट्यावर; राज्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या गटाचा मोठा निर्णय!

काँग्रेसमधील अतंर्गत गटबाजी चव्हाट्यावर

काँग्रेसमधील अतंर्गत गटबाजी चव्हाट्यावर

ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील ज्येष्ठ नेत्याच्या एका गटानं हायकमांडची भेट घेत मोठी मागणी केली आहे.

नागपूर, 26 मे : काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अजूनही पक्षात खदखद कायम आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा दिल्लीत जाऊन हायकमांडची भेट घेतली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस वाचवायची असेल तर नाना पटोले यांना हटवा अशी मागणी या नेत्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. या नेत्यांमध्ये विजय वडेट्टीवार, सुनील केदार, शिवाजीराव मोघे आणि संजय निरुपम या नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस नेत्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वीही घेतली होती हायकमांडची भेट  

दरम्यान नाना पटोलेंबाबत हायकमांडकडे तक्रार करण्याची काँग्रेस नेत्यांची ही पहिलीच वेळ नाहीये. तर या आधीही महाराष्ट्रातील काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली होती. तेव्हाही त्यांनी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी केली होती. आता पुन्हा एकदा राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. त्यांनी नाना पटोले यांना हटवण्यात यावं अशी मागणी केली आहे. त्यावर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पहावं लागणार आहे.

आशिष देशमुखांचे आरोप 

दरम्यान आशिष देशमुख यांनी देखील नाना पटोले यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसमधून जोर धरत असल्यानं आता नाना पटोले यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Congress, Nagpur, Nana Patole, Rahul gandhi, Sonia gandhi