Home /News /maharashtra /

Gangster Abu Khan case : पोलिसांच्या चौकशीनंतर काँग्रेस नेत्याचा मृत्यू, नागपूरमध्ये खळबळ

Gangster Abu Khan case : पोलिसांच्या चौकशीनंतर काँग्रेस नेत्याचा मृत्यू, नागपूरमध्ये खळबळ

कुख्यात गँगस्टार आणि ड्रग्ज तस्कर अबू खान प्रकरणी चौकशीसाठी बोलावलेल्या काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाला आहे.

नागपूर, 9 जून : नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कुख्यात गँगस्टार आणि ड्रग्ज तस्कर आबू खान प्रकरणी चौकशीसाठी बोलावलेल्या काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाला आहे. लतीफ शेख असं या काँग्रेस पदाधिकाऱ्याचं नाव आहे. लतीफ शेख यांनी आबू खानला तो फरार असताना एक लाख रुपयांची मदत केली होती, असा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं. पण पोलिसांच्या चौकशीनंतर घरी आल्यानंतर रात्रीच्या वेळी लतीफ शेख यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं. नागपूर पोलिसांनी गेल्या आठवड्यात कुख्यात गँगस्टर आबू खानला अटक केली होती. पोलीस आबू खानची गेल्या आठवड्याभरापासून चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या कबुलीजबाबात लतीफ शेख यांचंदेखील नाव समोर आलं होतं. आबू खानने केलेल्या गुन्ह्यांमध्ये लतीफ शेख यांचा देखील समावेश होता, अशी माहिती चौकशीतून समोर आली होती. त्यामुळे पोलिसांनी लतीफ शेख यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर लतीफ शेख यांना सोडण्यात आलं होतं. पण घरी गेल्यानंतर रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. (नवनीत राणांनी स्वीकारलं मुख्यमंत्र्यांचं चॅलेंज, पण घातली ही अट!) लतीफ शेख यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना जबाबदार धरलं आहे. पोलिसांनी पोलीस कोठडीत लतीफ शेख यांची चौकशी करताना त्यांना प्रचंड मारहाण केली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा दावा मृतक लतीफ शेख यांच्या नातेवाईकांनी केला आहे. पण लतीफ यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. त्यांच्या मृत्यू हृदय विकाराच्या झटक्यानेच झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. आबू खानवर 40 पेक्षा जास्त गुन्हे  आबू खान याच्यावर 40 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्यावर मकोका लावला होता. पोलीस त्याच्या शोधात होते. पण तो गेल्या वर्षभरापासून फरार होता. अखेर गेल्या आठवड्यात नागपूर पोलिसांनी भंडाऱ्यातून त्यांच्या नांग्या ठेचत बेड्या ठोकल्या होत्या. आबू खानच्या गुन्हेगारीची मोठी यादी आहे. जीवे मारण्याची धमकी देणे, दुसऱ्याची मालमत्ता हस्तगत करणं अशा अनेक गुन्ह्यांमुळे त्याची दहशत निर्माण झाली होती.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या