मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यात Cold Wave धडकली; पुढचे 2 दिवस थंडीचा कहर, या जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यात Cold Wave धडकली; पुढचे 2 दिवस थंडीचा कहर, या जिल्ह्यांना अलर्ट जारी

Weather Forecast Today: वायव्य भारतात थंडीची लाट आली असून अनेक ठिकाणी कडाक्याचा गारठा पडला आहे. महाराष्ट्रात देखील थंडीची लाट धडकली आहे.

Weather Forecast Today: वायव्य भारतात थंडीची लाट आली असून अनेक ठिकाणी कडाक्याचा गारठा पडला आहे. महाराष्ट्रात देखील थंडीची लाट धडकली आहे.

Weather Forecast Today: वायव्य भारतात थंडीची लाट आली असून अनेक ठिकाणी कडाक्याचा गारठा पडला आहे. महाराष्ट्रात देखील थंडीची लाट धडकली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 20 डिसेंबर: गेल्या तीन ते चार दिवसांपासून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये हिमवर्षाव होत आहे. त्यामुळे उत्तरेकडील थंडीचे वारे येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान वायव्य भारतात थंडीची लाट (Cold wave) आली असून अनेक ठिकाणी कडाक्याचा गारठा पडला आहे. महाराष्ट्रात देखील थंडीची लाट (Cold wave in maharashtra) धडकली आहे. त्यामुळे बहुतांशी जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरला (temperature drop in maharashtra) आहे. नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांत थंडीची लाट धडकली आहे. याठिकाणी अनुक्रमे 7.8 आणि 8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

पुढील आणखी दोन दिवस विदर्भासह राज्यभरात गारठा वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये थंडीने कहर केला आहे. गोंदिया जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणत थंडी जाणवत आहे. येथील तापमान 8.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं आहे. सोमवारी राज्यातील सर्वात कमी तापमान धुळ्यात जिल्ह्यात नोंदलं गेलं असून येथील तापमान 5.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. यासोबतच पहाटे आणि रात्रीच्या सुमारास धुक्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा-'या' 10 देशांमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नाही! काय आहे कारण?

नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांसाठी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून येथे तापमानाचा पारा घसरता राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त आज वर्धा (9), ब्रह्मपूरी (10), बुलडाणा (10.5), अकोला (11.3), चंद्रपूर (11.4), गडचिरोली (11.6) तर यवतमाळ याठिकाणी 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चोवीस तासात पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगीट बाल्टीस्थान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारठा पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र, उत्तर भारत आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Weather forecast, महाराष्ट्र