मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : थंडीचा कडाका वाढला!, 'या' मार्केटमध्ये खरेदी करा स्वस्तात मस्त स्वेटर, जॅकेट

Video : थंडीचा कडाका वाढला!, 'या' मार्केटमध्ये खरेदी करा स्वस्तात मस्त स्वेटर, जॅकेट

X
उबदार

उबदार कपडे कमी भावात खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर नागपुरातील मार्केटमध्ये तुम्हाला हे कपडे अगदी स्वस्तात मिळतील.

उबदार कपडे कमी भावात खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर नागपुरातील मार्केटमध्ये तुम्हाला हे कपडे अगदी स्वस्तात मिळतील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

    नागपूर, 5 नोव्हेंबर : हिवाळा सुरू झाला असून गोड गुलाबी थंडीची चाहूल सर्वत्र जाणवू लागली आहे. थंडीचा कडाका वाढला आहे. अशात उबदार कपडे कमी भावात खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर नागपुरातील तिबेटीयन स्वेटर मार्केटमध्ये तुम्हाला स्वेटर, जॅकेट, कोट, सॉक्स, मफलर इत्यादी कपडे अगदी स्वस्तात मिळतील. 

    नागपूर शहरात एकदम वाढलेल्या थंडीमुळे बाजारात गरम कपड्यांच्या खरेदीसाठीची गर्दी वाढली आहे. नागपूरकरांसाठी एकाच ठिकाणी एकाच छताखाली लहान बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत गरम कपड्यांच्या खरेदीसाठीचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे.  वैद्यनाथ चौक येथे भरविण्यात आलेला स्वेटर बाजारात स्वेटर, जॅकेट, कोट, सॉक्स, मफलर इत्यादी कपडे अगदी स्वस्तात उपलब्ध झाली आहेत.

    एकाच छताखाली सर्व साहित्य

    45 वर्षाहून अधिक काळापासून नागपुरातील तिबेटी स्वेटर मार्केटचे नागपूरकरांशी नाते जुळलेले आहे. हिवाळी हंगाम सुरू होण्यापूर्वीच नागपुरात एकाच छताखाली हे मार्केट तळ ठोकून एकत्रित अशा स्वरूपात सुरू करण्यात येत. मार्केटमध्ये गरम कपड्यात प्रामुख्याने उत्तम गुणवत्ता असलेले लेडीज जॅकेट, जेन्ट्स जॅकेट, लेगीज, कान टोपी, मफलर, हातमोजे, इत्यादीसह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या मार्केटमध्ये स्वेटरचे मूल्य निश्चित केले आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच हे मार्केट एका मोठ्या टेंटमध्ये भरविण्यात येते. थंडीचे 4 महिने हे विक्रेते नागपुरात तळ ठोकून असतात. 

    Video: थंडीत अंग ठणकतयं? त्रास कमी होण्यासाठी 'या' टिप्स ठरतील फायदेशीर

    1975 सालापासून नागपुरात विक्री

    1975 साली सर्वप्रथम या स्वेटर विक्रेत्यांनी छोट्या प्रमाणावर दुकान लावून सुरुवात केली. त्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाल्याने प्रत्येक हिवाळ्यात 2-3 महिन्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ही दुकाने शहरात सजू लागली. त्यात टेम्पल रोड, कस्तुरचंद पार्क, महाल, गांधीबाग, कामठी, झाशी राणी चौक, गणेशपेठ, येथील फुटपाथवर ही दुकाने सुरुवातीच्या काळात लागली. 

    आता मार्केट वैद्यनाथ चौकात

    अनेक वर्ष ही दुकाने हिवाळ्यात सुरू असत. मात्र सतत होणाऱ्या फुटपाथवरील अनधिकृत दुकानाच्या कारवाईला त्रासून एकत्रितरित्या छोटेखानी मार्केट उभारून गरम कपड्यांची विक्रीचा मार्ग काढला. त्या थाटणीचे पाहिले मार्केट पंधरावर्षा आधी यशवंत स्टेडियम येथे सुरू करण्यात आले होते. त्यानंतर भगिनी मंडळ असं करत मागील काही वर्षांपासून हे मार्केट बैद्यनाथ चौक येथे सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती तिबेटीयन स्वेटर मार्केटचे प्रेसिडेंट पासांग यांनी दिली. 

    Nagpur : फडणवीसांच्या गावातील तरुण आहेत सरकारवर नाराज, पाहा Video

    स्वेटर विक्रेत्यांची खासियत म्हणजे ही स्वेटर स्वतः बनवतात त्यास बराच कालावधी, कौशल्य लागत असून त्याच्या किमती या सर्वसामान्यांना परवडण्या सारख्या नसल्याने आत्ता पर्याय म्हणून रेडीमेट उत्पादके दिल्ली, पंजाब, लुधियाना इत्यादी ठिकाणाहून मागविण्यात येतात. हे विक्रेते भारतात विविध राज्यात वसलेले आहेत. नागपूर नजीक गोंदिया जिल्ह्यातील गोठणगाव येथे देखील विक्रेत्यांचा निवासी कॅम्प आहे. 

    माफक दरात स्वेटरची विक्री

    स्वेटर मार्केटचे प्रेसिडेंट पासांग सांगतात की, पूर्वी या मार्केटमधील दुकानाची संख्या चारशेंच्या घरात होती, काळाच्या ओघात ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आत्ता या मार्केटमध्ये केवळ 75 दुकाने आहेत. सरासरी विक्रीच्या केवळ 20-25% नफा मिळवणे हे आमचे लक्ष्य आहे. माफक दरात एकाच जागी, कुटुंबातील सर्वांसाठी गरम कपडे उपलब्ध व्हावे या आमचा मुख्य हेतू आहे. 

    मार्केटचा पत्ता

    या मार्केटची वेळ सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत असते. आपण या मार्केटला भेट देण्यासाठी पत्ता-तिब्बती स्वेटर मार्केट. गणेशपेठ, वैद्यनाथ चौक, नागपूर. 

    First published:
    top videos

      Tags: Local18, Nagpur, Winter session