मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nagpur News : बच्चे कंपनीच्या ढोल-ताशा पथकाची नागपुरात चर्चा, परदेशी पाहुण्यांनाही घातली भुरळ, Video

Nagpur News : बच्चे कंपनीच्या ढोल-ताशा पथकाची नागपुरात चर्चा, परदेशी पाहुण्यांनाही घातली भुरळ, Video

X
नागपुरात

नागपुरात देशातील एकमेव शालेय मुलांचं ढोल ताशा ध्वज पथक आहे. C 20 साठी आलेल्या विदेशी पाहुण्यांनाही या बाचचमुंनी भूरळ घातली आहे.

नागपुरात देशातील एकमेव शालेय मुलांचं ढोल ताशा ध्वज पथक आहे. C 20 साठी आलेल्या विदेशी पाहुण्यांनाही या बाचचमुंनी भूरळ घातली आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Nagpur, India

  विशाल देवकर, प्रतिनिधी

  नागपूर, 22 मार्च: ढोल ताशा हे केवळ एक वाद्य नसून मराठी जणांमध्ये उत्साह, जल्लोष निर्माण करणारे माध्यम आहे. ढोल ताशांची परंपरा महाराष्ट्राची पारंपरिक वाद्य संस्कृती आणि शिवशाहीचा आभास घडवणारी आहे. आजही ही पारंपरिक कला महाराष्ट्रभरातील सर्व वयोगटातील ढोल ताशा प्रेमींनी जपली आहे. नागपुरात असेच एक अनोखं ढोल-ताशा पथक आहे. शिव नवयुग ढोल-ताशा-ध्वज पथक हे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील लहान मुलांचं एकमेव पथक आहे.

  ढोल ताशा महाराष्ट्राची परंपरा

  ढोल ताशा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीमंती दर्शवणारी वाद्य परंपरा मानली जाते. महाराष्ट्रात सण, उत्सव, समारंभात ढोल ताशा पथकाचा जल्लोष असतोच. या परंपरेला ऐतिहासिक वारसा आहे. राज्यातील सर्व प्रमुख शहरे आणि गाव खेड्यांतही ढोल-ताशा पथके आहेत. शिवजयंती, गणेशोत्सव, नवरात्री उत्सव अशा उत्सवांत ढोल पथकांना विशेष महत्त्व असते. आता पुरुषांसोबत महिलांचीही ढोल पथके काही ठिकाणी आहेत. तसेच लहान मुलेही अशा पथकांमध्ये दिसतात.

  नागपुरात बालकांचे ढोल पथक

  नागपुरात शालेय मुलांचे ढोल ताशा पथक सध्या सर्वांचे लक्ष वेधत आहे. शिव नवयुग ढोल-ताशा- ध्वज पथक हे महराष्ट्रातील किंबहुना देशातील एकमेव ढोल ताशा पथक मानलं जात आहे. नवयुग प्राथमिक शाळेचे शिक्षक असलेल्या गौरव शिंदे यांच्या नेतृत्वात या शिव नवयुग ढोल ताशा ध्वज पथकाची सुरुवात नोव्हेंबर 2022 पासून झाली. सुरुवातीला पहिले ते चौथी या सहा ते नऊ वर्ष वयोगटातील एकूण 75 मुले या पथकात सामील झाली होती.

  ढोल ताशा पथकाला बाल मावळ्यांचा प्रतिसाद

  अल्पावधीतच अनेक विद्यार्थ्यांना ढोल ताशा पथका बद्दल आकर्षण निर्माण होऊन ते या पथकामध्ये सामील झाले. या लहानग्या वादकांना पालकांचे देखील सहकार्य लाभल्याने आजवर या पथकाने अनेक ठिकाणी वादन करत उपस्थितांचे मने जिंकली आहेत. सध्या पथकातील मुलांची संख्या 150 च्या घरात असून येत्या काळात ही संख्या वाढणार आहे.

  Gudi Padwa 2023 : शोभायात्रेत कोल्हापूरकरांनी अनुभवली महाराष्ट्राची लोककला, पाहा Video

  G20 मध्येही सादर केली कला

  नागपुरात यंदा G20 परीषद होत आहे. त्याअंतर्गत C 20 साठी परदेशातून नागपुरात पाहुणे आले होते. त्यांच्या स्वागताची संधी या बालचमुंच्या ढोल ताशा ध्वज पथकाला मिळाली. या चिमुकल्या वादकांनी फुटाळा येथे वादन करून विदेशी पाहुण्यांची मने जिंकली.

  शाळेच्या पटांगणात होतो सराव

  राजाभाक्षा येथील नवयुग प्राथमिक शाळेच्या पटांगणात या पथकाचा सराव होतो. दररोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर सराव सुरू होतो. गांधी टोपी, पांढरा कुर्ता, पायजमा, लाल रंगाचा शेला अशी या पथकातील मुलांची वेशभूषा असून मुलींसाठी एकाच रंगातील नऊवारी पातळ, नाकात नथ, केसांचा अंबाडा आणि गजरा अशी वेशभूषा आहे.

  Gudi Padwa 2023 : कुर्ल्यातील शोभा यात्रेत रंगला प्रात्याक्षिकांचा थरार, पाहा Video

  लहान मुलांत संस्कृती प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न

  लहान मुलांमध्ये शिक्षणाबरोबरच शिस्त, वकृत्व, चांगले संस्कार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शाळेतील अभ्यासाबरोबरच फावल्या वेळेत कलेशी मैत्री करून आपली संस्कृती जोपासली जावी हा या पथका मागील मुख्य मानस आहे, अशी माहिती पथक प्रमुख गौरव शिंदे यांनी दिली.

  First published:
  top videos

   Tags: Culture and tradition, Local18, Nagpur, Nagpur News