उदय तिमाडे, प्रतिनिधी
नागपूर, 27 मार्च : 'भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. उद्धव ठाकरे मध्ये जर धमक असेल. तर त्यांनी लगेच काँग्रेस पक्षापासून दूर होण्याचे जाहीर करावे. धमक असेल तर काँग्रेसची साथ सोडण्याचे जाहीर करा, उद्या जाहीर करा, नुसतं तोंडाच्या वाफा काढू नका' असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
मालेगावमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या मुद्यावर काँग्रेसला खडेबोल सुनावले तर भाजपवरही टीका केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी बावनकुळे यांचा कुळही काढला होता. त्यावर आज बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली.
'उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे, ते मुख्यमंत्री असताना 50 वेळेला काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, टीका केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी तेव्हा मुख्यमंत्रिपद सोडले नाही... काँग्रेसच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद भोगले' अशी टीका बावनकुळेंनी केली.
(सावरकर 'मविआ'साठी कळीचा मुद्दा ठरणार? पटोलेंनी दोन शब्दात विषय संपवला)
'भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. उद्धव ठाकरे मध्ये जर धमक असेल. तर त्यांनी लगेच काँग्रेस पक्षापासून दूर होण्याचे जाहीर करावे. धमक असेल तर काँग्रेसची साथ सोडण्याचे जाहीर करा, उद्या जाहीर करा, नुसतं तोंडाच्या वाफा काढू नका, असं आव्हानही बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना केलं.
'ज्या उद्धव ठाकरे कधी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढले नाही. मागच्या दरावरून विधानपरिषद गेलेले उद्धव ठाकरे कशाला निवडणूक घेण्याची गोष्ट करतात. ज्यांना निवडणूक लढण्याची सवय नाही. त्यांनी निवडणुकीच्या गप्पा मारू नये. जेव्हा केव्हा निवडणूक होईल आम्ही विधानसभेतील 200 जागा जिंकून येऊ, असा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केला.
'उद्धव ठाकरे नेहमी माझ्या कुळाचा उल्लेख करतात. आमचा बावनकुळे कूळ हिंदुत्ववादी आहे. तुम्ही तुमचा कूळ बुडविला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचे ज्या कुळाला उंची दिली होती. तो तुम्ही बुडवला आहे. उद्धव ठाकरे तुम्ही ठाकरे कुटुंबाचा नाव बुडवत आहात, अशी टीकाही बावनकुळेंनी केली.
(आमची सावरकरांबाबतची भूमिका स्पष्ट, राहुल गांधींची भेट घेणार; राऊतांनी पुन्हा सुनावलं)
'एकदा तरी ठाकरेपणा दाखवा. काँग्रेस पक्षाची साथ सोडा. ते रोज सावरकरांचा अपमान करतात. एकदा तरी ठाकरेपणा दाखवा आणि बाहेर पडा. फक्त सभेतूनच वल्गना करू नका, असंही बावनकुळेंनी सुनावलं.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नौटंकी करत आहे. एकदा तुम्ही ठरवा आणि निर्णय घ्या. मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी तुम्ही काँग्रेस पक्षाकडे गेला. जर तुम्ही काँग्रेस पक्षाची साथ सोडली, तर संपूर्ण महाराष्ट्र तुमचा अभिनंदन करेल. मी सुद्धा उद्धव ठाकरेंचा अभिनंदन करेल, असंही बावनकुळे म्हणाले.
संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. संजय राऊत फुसकी फटाका आहे. त्यांच्या संदर्भात मी बोलणार नाही, असा टोलाही बावनकुळेंनी राऊतांना टोला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.