मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बाळासाहेबांनी हेच संस्कार दिले का? भाजपाचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

बाळासाहेबांनी हेच संस्कार दिले का? भाजपाचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  Ajay Deshpande

नागपूर , दिनांक 24  नोव्हेंबर :  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  राज्यातील औद्योगिक प्रकल्प उध्दव ठाकरे यांच्या काळात गेले, राज्याच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत, त्यांनी काही बोलणं म्हणजे विनोद करण्यासारखं आहे. असा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे. ते नागपुरात बोलत होते.

बावनकुळेंचा हल्लाबोल  

आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  राज्यपालांवर अशा पद्धतीने कोणी टीका केली नाही, ठाकरे आणि त्यांची टीम बावचळली आहे. राज्यपालांनी शिवरायांबद्दल 50 चांगल्या गोष्टी केल्या. ते शिवनेरीवर पाई चालत गेले. मात्र तरीही त्यांच्या विधानाचे समर्थ होऊ शकणार नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

आमदार हुकूमशाहीला कंटाळले 

पुढे बोलताना बावनकुळे यांनी म्हटलं आहे की, त्यांनी राज्यपालांचे वय काढले. त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याची भाषा केली. व्यक्तीगत टीका केली. बाळासाहेबांनी हेच संस्कार दिले का? आपण आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याबाबत बोलणार का? असा सवाल बावनकुळे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हुकूमशाहीने सरकार चालवले. हुकूमशाहीला कंटाळून आमदारांनी त्यांना सोडलं. अडीच वर्षात एका ही आमदाराच्या पत्रावर रिमार्क केला नाही. सामान्य माणसाचे तर सोडूनच द्या असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांवर निशाणा  

दरम्यान यावेळी बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील टोला लगावला आहे. कोणी ज्योतिषाकडे गेलं तर तो त्यांचा अधिकार आहे. शरद पवार व्यक्तिगत जीवनात लक्ष घालतील असं वाटत नाही. यामुळे पवार साहेबांची प्रतिमा डागळत असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Uddhav Thackeray