मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विद्यार्थ्यांनो, यावर्षीच्या CET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पाहा कधी आहे तुमचा पेपर?

विद्यार्थ्यांनो, यावर्षीच्या CET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पाहा कधी आहे तुमचा पेपर?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी राज्यातील प्रवेश परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. विद्यार्थ्यांनो तुमचा पेपर कधी आहे हे इथं चेक करा

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Nagpur, India

  विशाल देवकर, प्रतिनिधी

  नागपूर, 24 मार्च :  शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी राज्यातील विद्यापीठांमधील निरनिराळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या सत्राला येत्या शनिवार 25 मार्च पासून सुरुवात होणार आहे. राज्य सामाईक परीक्षा कक्ष (सीईटी सेल )मार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. त्यानुसार एमबीए सीईटी ही येत्या 25 आणि 26 मार्चला होणार आहे,तर एमसीए सीईटी 27 मार्च रोजी राज्यातील विविध ठिकाणी घेण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षांसह अन्य परीक्षांचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्याचे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आलं आहे.

  कधी होणार परीक्षा?

  यावर्षीच्या परीक्षांमध्ये सर्वात आधी एमबीए अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा होणार आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत या सगळ्या परीक्षा पूर्ण करण्यात येतील. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रबाहेरील विविध परीक्षा केंद्रावरही या परीक्षा घेण्यात येणार आहे. एमबीएसाठीची  प्रवेश परीक्षा सर्वात आधी म्हणजेच 25 आणि 26 मार्च रोजी होणार आहे.

  एमसीए परीक्षा सोमवार 27 मार्च रोजी घेण्यात येईल, तर इंजीनियरिंग प्रथम वर्ष पदवीच्या प्रवेशासाठी अनेक विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतात. एमएचटी - सीईटी ही परीक्षा 9 मे पासून प्रारंभ होईल. पीसीएम ग्रुपसाठीची परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान होणार आहे तर पीसीबी ग्रुपची परीक्षा 15 ते 20 मे दरम्यान होणार आहे.

  बँकिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी मोठी संधी; 'या' बँकेत होतेय बंपर पदभरती; तुम्ही आहात का पात्र?

   सीईटी सेलकडून प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार बीएड- एमएड तसेच बीए-बीएड / बीएस्सी - बीएड सीईटी परीक्षा येत्या 2 एप्रिलला घेण्यात येतील. फाइन आर्ट्स अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एएसी सीईटी 16 एप्रिलला होणार आहे. एमपीएड सीईटी 23 एप्रिल ला तर बीएड सीईटी 23 ते 25 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे.

  लॉ सीईटी हा पाच वर्षाच्या अभ्यासक्रम असलेली सीईटी 20 एप्रिलला, तर लॉ सीईटी हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम असलेली परीक्षा 2 आणि 3 मे रोजी होणार आहे. या सर्व सीईटी परीक्षांसाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सीईटी सेलच्या संकेतस्थळावरून भरता येणार आहे.

  काही परीक्षांचे अर्ज भरण्याची मुदत संपली असून काही परीक्षांसाठी अद्यापही अर्ज स्वीकारण्यात येत आहे. अशी माहिती सीईटी सेलकडून परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. परीक्षांच्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळापत्रकासाठी सीईटी सेलच्या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

  आरोग्य सेवकाचा मुलगा बनला उपजिल्हाधिकारी! पाहा काय आहे यशाचा मंत्र, Video

  इंजीनियरिंग, फार्मसी, एग्रीकल्चर इत्यादी पदवी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटीची सीईटी परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी करत असतात या परीक्षेसाठी 15 एप्रिल पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे पीसीएम गटासाठी ही परीक्षा नऊ ते 13 मे या कालावधीत होईल तर पीसीबी गटासाठी ही परीक्षा 14 ते 20 मे या कालावधीत होणार आहे असं सीईटी सेलनं स्पष्ट केलं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Career, Education, Exam, Local18, Nagpur