मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आई-बाबा फ्लॅट नावावर करा नाही तर जीव घेईल; मुलाची धमकी अन्.., नागपुरातील खळबळजनक घटना

आई-बाबा फ्लॅट नावावर करा नाही तर जीव घेईल; मुलाची धमकी अन्.., नागपुरातील खळबळजनक घटना

धमकी देणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

धमकी देणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

नागपूर, 26  मे, उदय तिमांडे:  नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई, वडील फ्लॅट नावावर करत नसल्यानं मुलानेच आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आई-बाबा फ्लॅट माझ्या नावावर करा, नाहीतर जीव घेईल अशा प्रकारची धमकी आरोपी मुलगा आपल्या आई-वडिलांना देत होता. अखेर मुलाच्या छळाला कंटाळलेल्या वडिलांनी मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अमित अरबट असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचं नाव आहे. तो सतत दारू पिऊन आपल्या आई-वडिलांना मारहाण करत होता. त्याने फ्लॅट आपल्या नावावर करण्याचा तगदा त्याच्या वडिलांकडे लावला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

बैलगाडा शर्यत सुरू झाली अन् स्टेजवर घडला भलताच प्रकार, आयोजकही झाले हैराण

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अमित अरबट याला दारूचं व्यसन होतं, तो सतत दारू पिऊन आई-वडिलांना मारहाण करत होता. त्याने फ्लॅट आपल्या नावावर करून देण्यासाठी आई-वडिलांकडे तगादा लावला होता. फ्लॉट नावावर करून द्या नाहीत तर जीव घेईल अशी धमकी तो आपल्या आई-वडिलांना देत होता. अखेर मुलाच्या छळाला कंटाळलेल्या वडिलांकडून त्याच्याविरोधात नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. वडिलाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: Nagpur, Nagpur News