मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; फडणवीसांचा दिल्ली दौरा, संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर

मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; फडणवीसांचा दिल्ली दौरा, संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर

मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग

मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग

मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर काल फडणवीस दिल्लीला गेले होते. ते मध्यरात्री पुन्हा राज्यात परतल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर , 20 मे :  मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या 23 किंवा 24 मे रोजी मंत्रिमंडळांचा विस्तार होण्याची शक्यता आहे. न्यूज 18 लोकमतला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल सायंकाळी दिल्लीमध्ये गेले होते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर ते पुन्हा मध्यरात्री राज्यात परतले आहेत. त्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

या आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी? 

मंत्रिपदासाठी शिंदे गट, भाजपमधील अनेक आमदार देव पाण्यात घालून बसले आहेत. त्यातील काहींना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. ज्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, अशा आमदारांची नाव पुढे आली आहेत. ज्यामध्ये  1) भरत गोगवले ( जलसंधारण), 2) संजय शिरसाट ( परिवहन किंवा समाजीक न्याय मंत्री ), 3) प्रताप सरनाईक( गृहनिर्माण मंत्रालय ) , 4) बच्चू कडू (दिव्यांग विकास मंत्री),  5) सदा सरवणकर,  6) यामिनी जाधव, 7) अनिल बाबर आणि चिमन आबा पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.

निकालानंतर हालचालींना वेग 

शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला होता. गेल्या आठवड्यात न्यायालयानं अपात्रेसंदर्भात निर्णय दिला आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shiv sena