मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /buldana samriddhi highway accident : समृध्दी महामार्ग उठला विदर्भकरांच्या जीवावर, 15 दिवसांत 4 जणांनी गमावला जीव!

buldana samriddhi highway accident : समृध्दी महामार्ग उठला विदर्भकरांच्या जीवावर, 15 दिवसांत 4 जणांनी गमावला जीव!

लढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील शिवनापिसा गावाजवळ दोन कारमध्ये अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

लढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील शिवनापिसा गावाजवळ दोन कारमध्ये अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

लढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील शिवनापिसा गावाजवळ दोन कारमध्ये अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India

बुलडाणा, 17 जानेवारी : मागच्या काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांच्या मोठ्या घटना होताना दिसून येत आहेत. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील शिवनापिसा गावाजवळ दोन कारमध्ये अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पुन्हा समृद्धी महामार्ग चर्चेत आला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी या महामार्गाव नील गायी आडव्या आल्याने भीषण अपघात झाला होता. ही घटना ताजी असतानाच काल मोठा अपघात झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील शिवनापिसा गावाजवळ दोन कारमध्ये अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील शिवना पिसा या गावाजवळ  एक कार काही कामानिमीत्त उभी होती. दरम्यान या कारला पाठीमागून जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली.

या झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मेहकर येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. अपघातानंतर अपघात ग्रस्त वाहने समृद्धी मार्गावरून हटविण्यात आली आहेत.

विदर्भात समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका

वाशिम जिल्ह्यातील कारंजा परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतकांमध्ये एक महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. नागपुरच्या दिशेने जाणारी कार पलटी होऊन हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

समृद्धी महामार्गावर नागपूरच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या कारचे टायर फुटले, त्यामुळे गाडी चार वेळा पलटी झाली. अखेर विरुद्ध दिशेच्या कडेला जाऊन धडकली, ही घटना सोमवारी लासूर स्टेशन जवळ घडली. सुदैवाने या अपघातात कार मधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

हे ही वाचा : बलात्कार प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतरही नराधमाकडून पीडितेचा पाठलाग; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

या प्रकरणी अधिक माहिती अशी की (MH 31 EK 1362) या कारमधून एक कुटुंब शिर्डी येथून नागपूरकडे जात होते. या गाडीमध्ये दोन पुरुष, दोन महिला व लहान मुले होती. दरम्यान लासूर स्टेशन जवळ आल्यावर चालकाने गाडीचा वेग वाढवला.

First published:

Tags: Accident, Buldhana, Buldhana news, Nagpur