बुलडाणा, 29 मार्च : बुलढाणा जिल्ह्यात आगीच्या घटनांच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना बुलढाणा तालुक्यातील इरला येथे रात्रीच्या सुमारास घडली आहे. शेतातील गोठ्याला आग लागल्याने या आगीमध्ये शेतकरी भागवत सरोदे यांची 8 जनावरे जळाली आहेत. तसेच शेतीपयोगी साहित्य सुद्धा जळून खाक झाल्याने त्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी सरोदे हे नेहमीप्रमाणे जनावरांना चारापाणी करून घरी आले होते. दरम्यान त्यांच्या गोठ्यात त्यांनी त्यांनी शेतीपयोगी साहित्य ठेवलेले होते. रात्रीच्या सुमारास सरोदे यांच्या गोठ्याला अचानक आग लागली. यामधे आठ जनावरे आणि शेती साहित्य जळाले आहे.
शिकारीच्या शोधात बिबट्या थेट विहिरीत, 3 तासांच्या थरारानंतर वाचला जीव
याप्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. यावेळी शेतकरी भागवत सरोदे यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची केली आहे. ही कशामुळे लागली याप्रकरणी अद्यापही कारण समजू शकले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana, Buldhana news, Local18, Pet animal