मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपूरात आई-वडिलांकडून 5 वर्षांच्या मुलीवर Black Magic; प्रश्नांची उत्तरं दिली नाही म्हणून मारून मारून घेतला जीव

नागपूरात आई-वडिलांकडून 5 वर्षांच्या मुलीवर Black Magic; प्रश्नांची उत्तरं दिली नाही म्हणून मारून मारून घेतला जीव

इतकच नाही तर मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिला रुग्णालयात सोडून आई-वडील आणि आत्या तिघांनीही पळ काढला.

इतकच नाही तर मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिला रुग्णालयात सोडून आई-वडील आणि आत्या तिघांनीही पळ काढला.

इतकच नाही तर मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिला रुग्णालयात सोडून आई-वडील आणि आत्या तिघांनीही पळ काढला.

  नागपूर, 7 ऑगस्ट : नागपुरात एका पती-पत्नीने आपल्या 5 वर्षांच्या मुलीला इतकं मारलं की, यात तिचा मृत्यू झाला. ती वाईट शक्ती दूर करीत असल्याचं सांगत मुलीवर काळी जादू करीत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवार-शनिवारीदरम्यान रात्री घडली. मुलीचे वडील सिद्धार्थ चिमने (45 वर्षे), आई रंजना (42 वर्षे) आणि आत्या प्रिया बानसोड (32 वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे.

  युट्यूबवर लोकल न्यूज चॅनल चालवित होते वडील... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील सिद्धार्थ यूट्यूबवर एक लोकल न्यूज चॅनल चालवतात. गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी पत्नी आणि 5, 16 वर्षांच्या मुलींना घेऊन तकलघाट भागातील एका दर्ग्यावर गेले होते. तेथून परतल्यानंतर त्यांना आपल्या लहान मुलीच्या वागणुकीत बदल दिसून आला. त्यांना वाटलं की, मुलीवर वाईट शक्तींचा वास आहे. यासाठी त्यांनी मुलीवर काळी जादू करण्याचं ठरवलं.

  मुलीचे वडील आणि आत्याने रात्री मुलीवर काळी जादू केली. यादरम्यान मुलगी रडू लागली. यावेळी त्यांनी मुलीला काही प्रश्न विचारले. जे प्रश्न मुलगी समजू शकली नाही, आणि उत्तरही देऊ शकली नाही. यानंतर तिघांनी मिळून मुलीला मारहाण सुरू केली. त्यांनी मुलीला इतकं मारलं की, ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. आरोपीने या सर्व घटनेचा एक व्हिडीओदेखील शूट केला आहे. आरोपीच्या फोनमध्ये हे रेकॉर्डिंग होतं.

  शनिवारी सकाळी तिघांनी मुलीला आधी दर्ग्यात नेलं. यानंतर तिला सरकारी रुग्णालयात दाखल करुन पळून गेले. रुग्णालयातील सिक्युरिटी गार्डला तिघांवर संशय आला, त्यामुळे त्याने त्यांच्या कारचा फोटो क्लिक करुन ठेवला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं आणि पोलिसांना याची सूचना दिली. सिक्युरिटी गार्डने क्लिक केलेल्या फोटोच्या आधारावर गाडीच्या नंबरवरुन आरोपींची ओळख पटली. शेवटी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Crime news, Murder, Nagpur

  पुढील बातम्या