नागपूर, 21 जानेवारी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात सध्या खासदार क्रीडा महोत्सव सुरू आहे. या अंतर्गत सुरू असेलल्या क्रिकेट सामन्यात भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने पंच आणि आयोजकांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. भाजप नेत्याच्या मुलाने पंच आणि आयोजकांना मारहाण केल्यानं या महोत्सवाला गालबोट लागलं आहे. मुन्ना यादव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. या आधी देखील अशा घटना घडल्या आहेत.
सामन्यामध्ये वाद
खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत छत्रपती चौकात खामला एलेव्हण आणि स्टार इलेव्हण या दोन संघामध्ये सामना होता. यातील एका संघामध्ये मुन्ना यादव यांचे पुत्र अर्जुन आणि करन यांचाही समावेश होता. सामना सुरू असताना अर्जुने ने थ्रो बॉल वर पंचांशी वाद घातला. पंचांनी त्याला समजावून सांगितलं. मात्र तो निर्णय मागे घेण्यावर मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन आडून बसला. त्याने ग्राउंडवरच गोंधळ घालायला सुरुवात केली.
पीडितांची पोलीस ठाण्यात धाव
मात्र तरीही पंचांनी हा निर्णय मागे घेण्यास नकार दिल्यानं त्यानं मैदानात गोंधळ घालत मरहाण केली. तसेच यादव यांच्या समर्थकांनी मैदानात गोंधळ घातला. यामुळे सामना बंद करावा लागला. याची तक्रार आयोजक संदीप जोशी यांच्याकडे करण्यात आली आहे, मात्र दोन दिवस उलटूनही आयोजकांनी यावर काही कारवाई न केल्यानं अखेर या प्रकरणातील पीडित व्यक्तींनी आता पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Cricket, Crime, Crime news, Nagpur, Nagpur News, Nitin gadkari