Home /News /maharashtra /

माओवाद्यांचा मोठा घातपाताचा कट उधळला, पोलिसांची मोठी कारवाई

माओवाद्यांचा मोठा घातपाताचा कट उधळला, पोलिसांची मोठी कारवाई

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात हेटळकसाच्या जंगलात पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी माओवाद्यांनी दारुगोळ्यासह स्फोटकांनी भरलेले कुकर आणि इतर साहित्य लपवुन ठेवले होते.

    गडचिरोली, 5 ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. माओवाद्यांचा मोठा घातपाताचा कट होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेने हा उधळला आहे. यासह घटनास्थळावरुन काही सामानही जप्त करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात हेटळकसाच्या जंगलात पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी माओवाद्यांनी दारुगोळ्यासह स्फोटकांनी भरलेले कुकर आणि इतर साहित्य लपवुन ठेवले होते. पोलिसांच्या शोध मोहिमेत स्फोटकांनी भरलेले दोन कुकर चार कार रिमोट वायर बंडल जप्त करण्यात आले आहे. यात स्फोटकांनी भरलेला कुकर बॉम्ब शोधक पथकाने जंगलात स्फोट करुन निकामी केला. पोलिसांच्या सतर्कतेने माओवाद्याचा मोठा कट उधळला गेला आहे. 4 ऑगस्टला महिला नक्षलवादीला अटक दरम्यान, महिला नक्षलवादी मुडे हिडमा मडावी हिला नाकाबंदी करून अटक करण्यात आली होती. ही कारवाई एटापल्ली पोलिसांनी केली. नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात शहीद सप्ताह पुकारण्यात आल्यामुळे 28 जुलै ते 3 ऑगस्ट सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती. हेही वाचा - उमेश कोल्हेच्या हत्येनंतर डिनर पार्टीचं आयोजन; आणखी दोघांना अटक, NIA ला मोठं यश एटापल्ली येथे 4ऑगस्टला महिलेची कसून चौकशी केली असता तिच्याकडे आक्षेपार्ह साहित्य मिळून आले होते. ती नक्षलवादी असल्याचे समोर आल्यानंतर तिला अटक करण्यात आली. कसनसूर दलममध्ये ती सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. हिडमा मडावी असे या महिलेचे नाव आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gadchiroli, Police

    पुढील बातम्या