मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अल्पवयीन मुलांना मोबाईल बंदी, असा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत

अल्पवयीन मुलांना मोबाईल बंदी, असा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत

पंचायत राजमुळे लोकशाहीत ग्रामपंचायतला मोठे अधिकार प्राप्त झाले आहे. ग्रामविकास योजना राबविताना ग्रामसभेतील ठरावांना महत्त्व आले आहे.

पंचायत राजमुळे लोकशाहीत ग्रामपंचायतला मोठे अधिकार प्राप्त झाले आहे. ग्रामविकास योजना राबविताना ग्रामसभेतील ठरावांना महत्त्व आले आहे.

पंचायत राजमुळे लोकशाहीत ग्रामपंचायतला मोठे अधिकार प्राप्त झाले आहे. ग्रामविकास योजना राबविताना ग्रामसभेतील ठरावांना महत्त्व आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Yavatmal, India
  • Published by:  Khushalkant Dusane

यवतमाळ, 16 नोव्हेंबर : राज्यात सर्वत्र तरुणांसह अल्पवयीनांमध्येही मोबाईल वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही हे प्रमाण सर्रास दिसून येते. या सर्व मोबाईलच्या अतिवापरामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील बांशी ग्रामपंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील बांशी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत किशोरवयीन मुलांना मोबाईल बंदी करण्यात आली. अशा प्रकारचा निर्णय घेणारी बांशी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. 11 नोव्हेंबर रोजी ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत काही महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले.

पंचायत राजमुळे लोकशाहीत ग्रामपंचायतला मोठे अधिकार प्राप्त झाले आहे. ग्रामविकास योजना राबविताना ग्रामसभेतील ठरावांना महत्त्व आले आहे. ग्राम विकासासोबतच समाज स्वास्थ्य तंदुरुस्त राहण्यासाठी काही ग्रामपंचायती ग्रामसभेत आगळेवेगळे ठराव घेत अंमलबजावणी करतात. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बांशी ग्रामसभेने असाच एक वेगळा प्रयोग केला आहे.

हेही वाचा -  आता गरिबाची पोरंही शिकणार विदेशात, एक हजार विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी 'एकलव्य'चा पुढाकार

किशोरावस्थेतील नवीन पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्याचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी बांशी ग्रामसभेत अठरा वर्षाखालील मुला-मुलींना मोबाईल वापरण्याची बंदी घातली आहे. या ग्रामसभेत काही महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये 18 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. याशिवाय 100 टक्के कर भरणाऱ्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागु करणे तसेच निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे तीनही ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेने घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. बांशीने मोबाईल बंदीचा आगळावेगळा निर्णय घेऊन तरुणाईला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

First published:

Tags: Mobile, Mobile Phone, Yavatmal