मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /माता न तू वैरिणी; आईनेच आपल्या मुलींना देहव्यापारासाठी विकलं; नागपुरातील घटनेनं खळबळ

माता न तू वैरिणी; आईनेच आपल्या मुलींना देहव्यापारासाठी विकलं; नागपुरातील घटनेनं खळबळ

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रातिनिधिक छायाचित्र

नागपूरमध्ये आईनेच आपल्या मुलींना देहव्यापारासाठी विकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

नागपूर, 22 मे, उदय तिमांडे : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींना देहव्यापार करण्यासाठी गोव्यात विक्री करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला. या प्रकरणात पोलिसांनी विजय टोनी या दलालाला अटक केली आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं ही महिला आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून देहव्यापार करत होती, अशी माहिती समोर येत आहे.

दलालाला अटक 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरमध्ये एका महिलेनं आपल्याच दोन मुलींना देहव्यापारासाठी गोव्यात विकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणात पोलिसांनी विजय टोनी नावाच्या दलालाला अटक केली आहे. अर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं ही महिला आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून देहव्यापार करत होती. मात्र अधिकच्या पैशाच्या लालसेनं तिने आपल्या 13 आणि 16 वर्षांच्या मुलींनाही यात ढकलले.

खळबळजनक! मेकअपसाठी गेली होती नवरी; पोलिसाने ब्यूटी पार्लरमध्ये घुसून झाडली गोळी

    पोलिसांच्या सतर्कतेमुळं अनर्थ टळला  

जास्त पैसे मिळतील या लालसेतून आईनेच विजय टोनी या दलालामार्फत आपल्या दोन मुलींना देहव्यापारासाठी गोव्यात विकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी दलाल विजय टोनी याला अटक केली असून, दोन मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Nagpur, Nagpur News, Police