Home /News /maharashtra /

भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू; अन् मृतदेह घेऊन संतप्त ग्रामस्थ थेट पोलीस ठाण्यात

भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू; अन् मृतदेह घेऊन संतप्त ग्रामस्थ थेट पोलीस ठाण्यात

मोहाडी तालुक्यातील वरठी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढराबोडी येथे रात्री अपघात झाला.

    भंडारा, 2 ऑगस्ट : भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दुचाकी चालकाला अटक करावी आणि मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला द्यावा, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह भंडारा जिल्ह्याच्या वरठी पोलीस ठाण्यात नेल्याची घटना घडली आहे. या घटनेने काही काळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. काय आहे संपूर्ण प्रकरण -  मोहाडी तालुक्यातील वरठी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढराबोडी येथे रात्री अपघात झाला. त्यात शुभम सुनील वाघमारे (वय 21) याने आपल्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक एमएच 40 बीबी 6597) ही भरधाव व निष्काळजीपणाने चालवून विजय गडिराम चकोले (41) यांना जोरदार धडक दिली. यात विजय चकोले हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर विजय चकोले हे दुकानात गेले होते. तिथून घराकडे परतत असताना शुभमने भरधाव दुचाकी चालवून त्यांना समोरून धडक दिली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती संतप्त ग्रामस्थांनी वरठी पोलिसांना दिली. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या आणि फरार झालेल्या शुभमला तत्काळ अटक करून मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करत संतप्त ग्रामस्थांनी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह थेट वरठी पोलीस ठाण्यात नेला. हेही वाचा - मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारणं पित्याच्या जीवावर बेतलं; नागपुरातील संतापजनक घटना यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्यावर अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर तासभरानंतर ग्रामस्थांनी मृतदेह गावाकडे नेऊन अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bhandara Gondiya, Bike accident, Crime news, Death

    पुढील बातम्या