नागपूर, 23 जानेवारी : नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी श्रीमंत घरातील पोरांनी रस्त्यावर भरधाव गाड्या चालवून गोंधळ माजवला होता. ही घटना ताजी असताना आता डॉक्टरांचा प्रताप समोर आला आहे. दोन डॉक्टरांनी कारची रेस लावली पण गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला आहे.
नागपुरातील पडोळे चौकाअगोदर रिंग रोडवर रविवारी मध्यरात्री दोन कारचा अपघात झाला आहे. शहरातील दोन डॉक्टरांच्या कार रेस दरम्यान हा अपघात घडला. भरधाव कार नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे दोघांच्या कार कार पलटल्याय हा अपघात इतका जोरदार होता की, एक कार पलटी मारून एका घराच्या भिंतीवर जाऊन पडली तर दुसऱ्याच्या समोरील भागाचा चुराडा झाला.
(मंदिराच्या उत्सवात दुर्दैवी घटना, 5 सेकंदात क्रेन कोसळली, 3 जणांचा मृत्यू, VIDEO)
सुदैवाने या अपघातात डॉक्टरांना गंभीर जखमा झाला नाहीत. वरूण आणि अभिनव अशी डॉक्टरांची नावे आहे. हे दोघे हिंगणातील एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. रात्री उशिरा बाहेरून जेवण करून प्रतापनगर चौकातून संभाजीनगर चौकाकडे चालले होते. त्यावेळी दोघांनी कार रेस लावली. एकमेकांना हरवण्याच्या नादात दोन्ही कार एकमेकांना घासला गेल्या आणि काही क्षणात अपघात घडला. काही मीटर अंतरापर्यंत कार घासत गेल्या होत्या, अशीही माहिती समोर आली.
(समृध्दी महामार्ग उठला विदर्भकरांच्या जीवावर, 15 दिवसांत 4 जणांनी गमावला जीव!)
घटनेची माहिती मिळताच प्रताप नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला करण्यात आल्या आहेत. प्रताप नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur, Nagpur News, कार