मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यामागे लागलेला 'शनी' दूर करण्यासाठी हनुमान चालिसा पठण; महाराष्ट्रात दाखल होताच राणा दाम्पत्याचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

राज्यामागे लागलेला 'शनी' दूर करण्यासाठी हनुमान चालिसा पठण; महाराष्ट्रात दाखल होताच राणा दाम्पत्याचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

"राज्यामागे लागलेला 'शनी' दूर करण्यासाठी हनुमान चालिसा पठण" : नवनीत राणा

"राज्यामागे लागलेला 'शनी' दूर करण्यासाठी हनुमान चालिसा पठण" : नवनीत राणा

MP Navneet Rana and MLA Ravi Rana: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा नागपुरात दाखल झाले आहेत. नागपुरात दाखल होताच त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

नागपूर, 28 मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा राणा दाम्पत्याने निर्धार केला. त्यानंतर मुंबईत (Mumbai) जोरदार राडा झाला. या प्रकरणात खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना अटक सुद्धा झाली. त्यानंतर जामीनावर सुटका होताच राणा दाम्पत्य दिल्लीत पोहोचले. त्यानंतर आज राणा दाम्पत्य हे महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. नागपुरातील रामनगर येथील मंदिरात हनुमान चालिसा पठण राणा दम्पत्याकडून करण्यात येणार आहे. नागपूर विमानतळावर दाखल होताच राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं, आम्ही 36 दिवसांनी परतलो आहोत. महाराष्ट्रात हनुमान चालिसा बोलण्यास इतका विरोध का होत आहे? दिल्लीत आम्ही हनुमान चालिसा पठण केलं, रॅली काढली त्यावेळी तिथे सुरक्षा व्यवस्था होती. इथे महाराष्ट्रात रामाचा विरोध, हनुमान चालिसाला इतका विरोध का होत आहे. आज शनिवार आहे. महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाली पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही हनुमान चालिसा पठण करत आहोत.

आमदार रवी राणा यांनी म्हटलं, बजरंगबली यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नागपुरातील प्राचीन मंदिरात आम्ही दर्शन घेणार आहोत. तेथे हनुमान चालिसा पठण करणार आहोत. पण आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवताच मुख्यमंत्र्यांची झोप उडते. म्हणून हनुमान चालिसा पठणला विरोध कऱण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांची फौज इथे उभी केली आहे. येत्या काळात हनुमान भक्त आणि राम भक्त या मुख्यमंत्र्यांना धडा शिकवेल. उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रात आलेलं संकट आम्हाला दूर करायचं आहे.

वाचा : "समीर वानखेडे केंद्रीय यंत्रणेचे पोपट, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही"

राष्ट्रवादीकडूनही हनुमान चालिसा पठण

रामनगर येथे हनुमान मंदिरामध्ये नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम ठेवला त्याच वेळी त्याच मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस देखील हनुमान चालीसा पठण करणार आहे. खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा म्हणण्यावरून राजकीय संघर्षाचा पहिला अंक काही दिवासआधी मुंबईने बघितला होता. आता कदाचित त्याचा दुसरा अंक हा नागपूर मध्ये उद्याला दिसण्याची शक्यता आहे.

तिकडे मंदिर प्रशासनाने आमच्या मंदिराला राजकीय पक्षाने आपला आखाडा बनवू नये अशी विनंती केली आहे. मंदिरात कुणी हनुमान चालीसाच्या पठणाला आले तर आम्ही त्यांना अडवणार नाही. मात्र काही वाद झाला तर त्यासाठी पोलिस प्रशासन आहे. पोलिसांचे यावर लक्ष असणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.

राणा दाम्पत्याचा आजचा कार्यक्रम 

राणा दाम्पत्य आज 36 दिवसानंतर येणार अमरावती जिल्ह्यात

राणा दाम्पत्याचे जिल्ह्यात ठिक ठिकाणी होणार स्वागत

युवा स्वाभिमान पक्षाकडून राणा दाम्पत्याची जंगी स्वागताची तयारी

हनुमान चालीसा वरून 14 दिवस जेलवारी झाल्यानंतर राणा दाम्पत्य अमरावतीत काय भूमिका घेणार याकडे लागले लक्ष...

तिवसा येथे 4 वाजता स्वागत

4.30 वाजता तुकडोजी महाराज महासमाधी दर्शन

5 वाजता नांदगाव पेठ येथे बजरंग दल व विश्व हिंदु परिषदेतर्फे स्वागत

5.30 वाजता रहाटगाव येथे स्वागत

6 वाजता पंचवटी चौक स्वागत

6.30 वाजता इर्विन चौक स्वागत, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार अर्पण

7 वाजता महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन

7.30 वाजता राजकमल चौक येथे भव्य दिव्य स्वागत

रात्री 8 वाजता राजापेठ येथील हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालिसा पठण आणि महाआरती

First published:

Tags: Nagpur, Navneet Rana, Ravi rana, Uddhav thackeray