अमरावती, 4 डिसेंबर : खासदार नवनीत राणा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे. कारण नवनीत राणा राजकारणात कायम चर्चेत असतात. नेहमी ठाकरे गटात आणि उद्धव ठाकरेंवर टीकेची फटकेबाजी करणाऱ्या याच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज क्रिकेटच्या मैदानातही जोरदार फटकेबाजी केली आहे.
नवनीत राणांची फटकेबाजी -
अमरावती शहरातील वेलनेस सेंटरच्या उद्घाटनात खासदार नवनीत राणा आल्या होत्या. याच ठिकाणी अंबिका नगरमध्ये काही तरुण क्रिकेट खेळत होते. यावेळी त्यांचे लक्ष क्रिकेट खेळणाऱ्या मुलांकडे गेलं आणि क्रिकेट खेळण्याचा मोह नवनीत राणांना आवरता आला नाही. त्यांनी लगेच क्रिकेटच्या मैदानात उतरत बॅट हाती घेऊन क्रिकेटचा आनंद घेतला. इतकचं नाही तर क्रिकेटच्या मैदानात नवनीत राणांनी धावा देखील केल्यात. याचा व्हिडिओही समोर आला आहे.
राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होणार -
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या ना त्या प्रकरणामुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राणा दाम्पत्याच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची चिन्ह आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणात राणा दाम्पत्यांविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'भारत जोडो यात्रे'नंतर काँग्रेस सुरू करणार 'हाथ से हाथ जोडो अभियान', नेमकं काय आहे हे अभियान
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी दोघांना अटक झाली होती.
त्यानंतर त्यांना जामीन सुद्धा मिळाला होता. पण नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा आहे. या प्रकरणात राणा दाम्पत्यांविरोधात मुंबई सत्र न्यायालयानं वॉरंट जारी केलं आहे. न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी जारी केलेलं हे वॉरंट बेलेबल असलं तरी येत्या 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी जर दोघेही गैरहजर राहिले तर त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी होऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Cricket, Navneet Rana, Video