मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अमरावती : 3 तास चाकू पाठीतच राहिला; स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमादरम्यान धक्कादायक प्रकार

अमरावती : 3 तास चाकू पाठीतच राहिला; स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमादरम्यान धक्कादायक प्रकार

एक्सरेमध्येही स्पष्टपणे चाकू दिसून येत आहे.

एक्सरेमध्येही स्पष्टपणे चाकू दिसून येत आहे.

एक्सरेमध्येही स्पष्टपणे चाकू दिसून येत आहे.

संजय शेंडे/अमरावती, 15 ऑगस्ट : एकीकडे अमरावती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना शहरात मात्र दोन गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. आज सकाळी अकोला येथील कुख्यात गुन्हेगार असलेला राजेश राऊत अमरावतीला आल्याची कुन कूण लागताच अकोला येथील गुन्हे शाखेचे पथक अटक करायला आले होते. यावेळी पोलिसांवरच त्याने रिव्हॉल्वर रोखले. अखेर पोलिसांनी त्याच्या गाडीवर गोळीबार करून राजेश राऊत याला अटक केली. त्या घटनेचा तपास सुरू असतानाच अमरावतीत भर दिवसा प्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडाळी येथील प्रबुद्ध नगरमध्ये शुल्लक कारणावरून एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे हा चाकू तब्बल तीन ते साडेतीन तास पाठीत तसाच राहिला. प्रबुद्ध नगर येथे सम्राट तायडे हा आपल्या मित्रांसोबत डीजेच्या तालावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच रोहित धंदर व सुरज धंदर हे दोघे भाऊ त्या ठिकाणी आले. दारू पार्टीदरम्यान मित्राची हत्या; मुंबई एअरपोर्टच्या यूनियन ऑफिसमधील धक्कादायक प्रकार यावेळी सम्राट व धंदर बंधू यांच्यात वाद झाला. यातून धंदर बंधू यांनी सम्राटच्या पाठीत जोरदार चाकूने हल्ला केला व त्या ठिकाणाहून पळून गेले. चाकू थेट श्वसन नलिकेपर्यंत पोहोचल्याचं एक्स रेमध्ये निष्पन्न झाल्याने त्याला तातडीने नागपूरला नेण्यात आलं. अचानक चाकू काढल्यास मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो व त्यामुळे सम्राटचा जीव देखील जाऊ शकतो, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीतच चाकू काढावा लागेल असे डॉक्टरने सांगितले. 200 ml पेट्रोल प्यायला अन् कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; नागपूरातील BCA च्या विद्यार्थ्याचा मृत्यू कुटुंबीयांनी अमरावती येथील खाजगी रुग्णालयात सम्राट तायडे याला दाखल केले. तब्बल साडेतीन तासानंतर सम्राट याच्या पाठीतून चाकू काढण्यात आला. फेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच पोलिसांची टीम आरोपीच्या शोधात रवाना झाली आहे. सध्या दोन्ही धंदर बंधू फरार आहेत. पोलिसांचा शोध सुरू असून त्यांना तातडीने अटक करण्यात येईल, असे देखील पोलिसांनी सांगितलं.
First published:

Tags: Amravati, Crime, Independence day

पुढील बातम्या