मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अपहरण आणि सामूहिक अत्याचाराची तक्रार निघाली खोटी; नागपुरातील महाविद्यालयीन तरुणीचा बनाव उघड

अपहरण आणि सामूहिक अत्याचाराची तक्रार निघाली खोटी; नागपुरातील महाविद्यालयीन तरुणीचा बनाव उघड

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Nagpur: सोमवारी नागपुरातील एका महाविद्यालयीन तरुणीनं आपलं अपहरण करून सामूहिक अत्याचार केल्याची तक्रार (Kidnap and gang rape case) पोलीस ठाण्यात दिली होती.

नागपूर, 14 डिसेंबर: सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नागपुरातील (Nagpur) एका महाविद्यालयीन तरुणीनं आपलं अपहरण करून सामूहिक अत्याचार केल्याची तक्रार (Kidnap and gang rape case) पोलीस ठाण्यात दिली होती. सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनेनं पोलीस प्रशासन देखील खडबडून जागं झालं. पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत कसून तपास केला. तपासाअंती फिर्यादी तरुणीनं वैयक्तिक कारणातून सूड उगवण्यासाठी हा बनाव रचल्याचं समोर आलं आहे. तरुणीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एका महाविद्यालयीन तरुणीनं पोलिसांत धाव घेत आपलं अपहरण करून सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली होती. फिर्यादी तरुणीने रामदास पेठेतील संगीत शिकवणीला हजेरी लावल्यानंतर, ती दगडी पार्क परिसरातून जात असताना, दोघांनी तिचं अपहरण करत तिला कळमन्यात घेऊन गेले. याठिकाणी गेल्यानंतर दोघांनी  तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तक्रारीनुसार पोलिसांनी घटनास्थळावरील आणि आसपासच्या परिसरातील तब्बल 240 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.

हेही वाचा-7 महिन्यापूर्वीच थाटला होता संसार अन् माथेरानला नेऊन पत्नीचे छाटले शीर!

तपास अधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात तब्बल नऊ तास घालवून सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र तिने ज्या दगडी पार्कजवळून अपहरण झाल्याची बतावणी केली होती, त्याठिकाणी ती पोहोचलीच नसल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. यामुळे पोलीसही चक्रावले. त्यामुळे पोलिसांनी फिर्यादी तरुणीला विश्वासात घेत पुन्हा नव्याने विचारपूस केली.

हेही वाचा-नागपूर हादरलं, 19 वर्षीय तरुणीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार

यावेळी मात्र तरुणीनं आपल्यासोबत असं काहीही घडलं नसल्याची कबुली दिली आहे. प्रेम प्रकरण आणि वैयक्तिक कारणातून सूड उगवण्यासाठी आपण हा बनाव रचल्याचंही तिने यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. तरुणीनं दाखल केलेला अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा रद्द केला जाईल. तसेच खोटी तक्रार दिल्याच्या कारणातून तरुणीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Gang Rape, Kidnapping, Nagpur