मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही संपवलं आयुष्य; दोघांवर एकाचवेळी अत्यसंस्कार, नागपूर हळहळलं

हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही संपवलं आयुष्य; दोघांवर एकाचवेळी अत्यसंस्कार, नागपूर हळहळलं

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईने देखील आपलं आयुष्य संपवलं आहे.

नागपूर, 23 मे, उदय तिमांडे :  नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेटच्या सट्ट्यामध्ये सहा लाख रुपये हरल्यानं एका वीस वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आपल्या मुलाच्या आत्महत्येची बातमी कळताच त्याच्या आईने देखील विषारी द्रव्य पिऊन मृत्यूला कवटाळलं. आई आणि मुलावर एकचवेळी अत्यंसस्कार करण्यात आले. या कुटुंबातील वडील आणि मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. या घटनेत अख्ख कुटुंबच उद्धवस्त झाल्यानं जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

आईचीही आत्महत्या 

खितेश वादवानी असं या आत्महत्या केलेल्या वीस वर्षीय तरुणाचं नाव  आहे. समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे तो क्रिकेटच्या सट्ट्यामध्ये सहा लाख रुपये हरला होता. त्यानंतर बुकिच्या दबावामुळे त्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. दरम्यान आपल्या मुलाच्या आत्महत्येची बातमी समजताच त्याच्या आईने देखील विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. आई आणि मुलावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

गर्लफ्रेंडच्या लग्नाच्या दिवशी रेल्वे ट्रॅकवर मिळाला बॉयफ्रेंडचा मृतदेह, हत्या की आत्महत्या?

ही घटना नागपुरातील लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान बायको आणि मुलगा गमावल्यानं वडिलांनाही प्रचंड मानसिक धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनं नागपूर हादरलं आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Nagpur, Nagpur News