मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तांबेंच्या खेळीमुळे बाळासाहेब थोरात नॉट रिचेबल, नाना पटोलेही भडकले

तांबेंच्या खेळीमुळे बाळासाहेब थोरात नॉट रिचेबल, नाना पटोलेही भडकले

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुधीर तांबे यांच्या बंडखोरीनंतर चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र त्यानंतर आता बाळासाहेब थोरात हे देखील नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुधीर तांबे यांच्या बंडखोरीनंतर चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र त्यानंतर आता बाळासाहेब थोरात हे देखील नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुधीर तांबे यांच्या बंडखोरीनंतर चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र त्यानंतर आता बाळासाहेब थोरात हे देखील नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 13 जानेवारी :  नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र हातात एबी फॉर्म असूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर दुसरीकडे सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आता यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना  बंडखोरांना काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसेच बाळासाहेब थोरात देखील संपर्कात नसल्याचा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले पटोले?

नाशिकमध्ये जे झालं त्याची इत्यंभूत माहिती हायकमांडला दिली आहे. आज सत्यजित तांबे यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल. तांबे यांनी दग फटका केला. काँग्रेस कधीही बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांना काँग्रेसचं समर्थन नाही. काल दुपारपर्यंत बाळासाहेब थोरात संपर्कात होते, मात्र या घटनाक्रमानंतर ते संपर्कात नसल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे. तसेच नागपुरच्या उमेदवाराबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होईल असंही पटोले यांनी म्हटलं आहे.

भाजपावर निशाणा

दरम्यान यावेळी नाना पटोले यांनी भाजपावर देखील निशाणा साधला आहे. भाजपाला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. त्यांचे घर फुटेल तेव्हा घर फुटल्याचं दु:ख काय असतं याची जाणीव त्यांना होईल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

एमपीएससी आंदोलनाला पाठिंबा

राज्यात सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. सरकार आंदोलकांच्या मागण्या मान्य करत नसेल तर त्यांना सभागृहात घेरण्याची रणनिती आम्ही तयार केली आहे.  सरकार गरीब विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्यापासून रोखत आहे. मात्र काँग्रेस या विद्यार्थ्यांच्या पाठिशी असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Balasaheb thorat, Congress, Nana Patole, Nashik, Satyajit tambe