मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur: जीवघेण्या थंडीने चोरट्यांची केली हवा टाईट; बहाद्दरांनी शेकोटीसाठी पेटवली चक्क दुचाकी

Nagpur: जीवघेण्या थंडीने चोरट्यांची केली हवा टाईट; बहाद्दरांनी शेकोटीसाठी पेटवली चक्क दुचाकी

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Nagpur: जीवघेण्या थंडीत पोलिसांपासून लपण्यासाठी शेतात आसरा घेतलेल्या चोरट्यांची थंडीने चांगलीच हवा टाईट केली आहे.

  • Published by:  News18 Desk

नागपूर, 25 डिसेंबर: गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी जाणवत (Cold in vidarbha) आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक ठिकाठिकाणी शेकोट्या पेटवताना दिसत आहेत. नागपूर (Napur) आणि अमरावती परिसरात तर तापमानाचा पारा 7 अंशावर गेला आहे. दरम्यान अशा जीवघेण्या थंडीत पोलिसांपासून लपण्यासाठी शेतात आसरा (Hide from police) घेतलेल्या चोरट्यांची थंडीने चांगलीच हवा टाईट केली आहे. आसपास लाकडं न मिळाल्याने चोरट्यांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी चक्क दुचाकी पेटवल्याची (set two wheeler on fire for bonfire) घटना समोर आली आहे.

खरंतर, गेल्या काही दिवसांत नागपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल 10 दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे पोलीस दुचाकी चोरांच्या मागावर आहेत. असं असताना चोरट्यांनी चोरी केलेल्या दुचाकी गाड्या एका शेतात लपवून शहराबाहेर आसरा घेतला होता.

हेही वाचा-मुंबईत IPS अधिकाऱ्याची पत्नीही असुरक्षित; भुरट्या चोरानं लाबवली पर्स

दरम्यान रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी पडल्याने चोरट्यांची भयंकर अवस्था झाली होती. त्यामुळे त्यांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी आसपासच्या परिसरात लाकडं शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना लाकडं मिळाली नाहीत. शेवटी थंडीने गारठलेल्या चोरट्यांनी चक्क हजारो रुपये किमतीची दुचाकी पेटवली आहे. थंडीपासून वाचण्यासाठी चोरट्यांनी केलेला हा प्रकार पाहून पोलीसही हैराण झाले आहेत.

हेही वाचा-गरोदर पत्नीसोबत पतीचं राक्षसी कृत्य; दोन जीवांच्या महिलेनं जन्माआधीच गमावलं बाळ

जळून खाक झालेल्या दुचाकी गाडीचा सांगाडा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच हा विचित्र प्रकार नेमका कोणी केला? याची गुप्त माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. संबंधित प्रकार छोटा सर्फराज याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पथक आरोपी छोटा सर्फराजचा शोध घेत असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Nagpur, Theft