नागपूर, 13 डिसेंबर : कामठीचे भाजप आमदार टेकचंद सावरकर (BJP MLA Tekchand Savarkar) यांच्या मुलाविरोधात गौण खनिज चोरी प्रकरणी (Gaun Khanij theft) कारवाई करण्यात आली आहे. महसूल अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. टेकचंद सावरकर यांचा मुलगा भूषण सावरकर (Bhushan Savarkar) हा स्वतःच्या ट्रकमध्ये अतिरिक्त गौण खनिज भरुन चोरी करत असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांना मिळाली होती. याच माहितीच्या अधारावर ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे मौदा तहसीलदारांच्या पथकाने सापळा रचून संबंधित कारवाई केली. या कारवाईत महसूल विभागाने आमदार पुत्राचे दोन ट्रक जप्त केले आहेत. तसेच मौदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रात जमिनीखाली असलेल्या खाणी, दगडाच्या खाणी, नाले, खाड्या, नदीचे पाणी इत्यादी ठिकाणी आढळणाऱ्या खनिजावर राज्य सरकारचा अधिकार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 81 (1) नुसार हा अधिकार राज्य सरकारकडे आहे. या खनिजालाच गौण खनिज असं म्हटलं जातं. जमिनीखालून किंवा जमिनीवर असलेल्या या खनिज पदार्थांना काढण्याचा किंवा घेण्याचा अधिकार हा कुणाला नाही. त्याची जर आवश्यकता असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागते.
हेही वाचा : '...तर आम्ही मुस्लिम आरक्षणासाठी महापालिका निवडणूक लढवणार नाही', इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा
भाजपकडून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना तिकीट देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे काँग्रेसकडून त्यावेळी सुरेश भोयर यांना उमेदवारी देण्यात आली होती. भोयर यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षपदाचा अनुभव होता. त्यामुळे त्यांचं चांगलं वर्चस्व मानलं जात होतं. पण या निवडणुकीत टेकचंद विजयी झाले होते. नागपुरातील विधानसभेच्या या जागेवर भाजप आणि काँग्रेसमध्ये अत्यंत चुरशीची लढत बघायला मिळाली होती.
हेही वाचा : मुंबईत तब्बल दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली
दरम्यान, टेकचंद सावरकर हे कोरोना संकट काळात चर्चेत आले होते. त्यांच्याविरोधात कुणीतरी खट्ट्याळपणा करुन त्यांच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवली होती. कोरोना काळात मतदारसंघात फिरकले नाही म्हणून ते हरवले. त्यानंतर त्यांचं कोरोनामुळे निधन झालं, अशी धक्कादायक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टवरुन टेकचंद सावरकर यांनी संताप व्यक्त केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.